शहापूर तालुक्यामध्ये केली कांदा, लसणाची लागवड; नवा पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 01:11 AM2021-03-24T01:11:39+5:302021-03-24T01:11:49+5:30

कोर यांनी प्रथम आपल्या शेतात आंबे, नारळ, पपई, डाळिंब, तूर, हळद यांची लागवड केली.

Cultivation of onion, garlic in Shahapur taluka; New option | शहापूर तालुक्यामध्ये केली कांदा, लसणाची लागवड; नवा पर्याय

शहापूर तालुक्यामध्ये केली कांदा, लसणाची लागवड; नवा पर्याय

Next

वसंत पानसरे

किन्हवली : शहापूर तालुक्यातील टेंभा गावातील  प्रगतशील शेतकरी प्रकाश बेंडू कोर यांनी आपल्या शेतात कांदा व लसूण यांची लागवड केली असून पीकही उत्तम आले आहे. कोर हे मुंबई पालिकेचे निवृत्त कर्मचारी असून त्यांनी पारंपरिक शेतीला पर्याय म्हणून आपल्या शेतात बागायती शेतीची लागवड करून शेतकऱ्यांच्या समोर नवीन पर्याय ठेवला आहे.

कोर यांनी प्रथम आपल्या शेतात आंबे, नारळ, पपई, डाळिंब, तूर, हळद यांची लागवड केली. आपल्या वडिलोपार्जित शेतीची मशागत करून नवनवीन पिके स्वतः घेऊन परिसरातील शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन करतात. तालुक्यात पहिल्यांदाच कांदा व लसूण लागवड केल्यामुळे या ठिकाणी इतर शेतकरीही भेट देऊन पिकांची पाहणी करून माहिती घेत आहेत. या पुढील काळात शहापूर तालुक्यातही मोठ्या प्रमाणावर कांदा व लसूणची लागवड होऊन शेतकऱ्यांना एक उत्तम पर्याय निर्माण होणार आहे. 
 

Web Title: Cultivation of onion, garlic in Shahapur taluka; New option

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.