उल्हासनगर महापालिका शाळांचे सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव 

By सदानंद नाईक | Published: February 2, 2024 05:46 PM2024-02-02T17:46:47+5:302024-02-02T17:46:56+5:30

विजेत्या ठरलेल्या विद्यार्थी व संघांना प्रमाणपत्र व चषक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आल्या आहेत.

Cultural and Sports Festival of Ulhasnagar Municipal Schools | उल्हासनगर महापालिका शाळांचे सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव 

उल्हासनगर महापालिका शाळांचे सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव 

उल्हासनगर : महापालिका शिक्षण विभागामार्फत मनपा शाळांचा सांस्कृतिक कार्यक्रम व क्रिडा महोत्सव गुरवारी टाउन हॉल मध्ये गुरवारी संपन्न झाला. महोत्सवाचे उदघाटन महापालिका आयुक्त अजीज शेख यांच्या हस्ते झाले असून यावेळी आमदार कुमार आयलानी, बालाजी किणीकर, गणपत गायकवाड आदीजन उपस्थित होते.

 उल्हासनगर कॅम्प नं-३ येथील महापालिकेच्या टॉउन हॉल मध्ये मनपा शाळेचा सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव उत्सवात साजरा झाला. महोत्सवाचे उदघाटन आयुक्त अजीज शेख, आमदार गणपत गायकवाड, कुमार आयलानी, बालाजी किणीकर आदींच्या उपस्थित झाला. महापालिका शाळेचे शिक्षकवृंद, विध्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सांस्कृतिक कार्यक्रमाची थीम महाराष्ट्राची लोकधारा निश्चित करण्यात आली होती, त्याप्रमाणे महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जपणारी लोकगीते, पोवाडा, भुपाळी, भक्तीगीत, भारुड, कोळी गीत व उत्सव गीतांचा समावेश कार्यक्रमामध्ये करण्यात आल्याची माहिती प्रशासन अधिकारी दिपक धनगर यांनी दिली. विविध स्पर्धामध्ये सहभाग घेऊन विजेते ठरलेले विद्यार्थी व संघांना प्रमाणपत्र व चषक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आल्या आहेत.

 महापालिका मनपा शाळा सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवाला आमदार कुमार आयलानी, डॉ. बालाजी किणीकर, आमदार गणपत गायकवाड, महापालिका आयुक्त अजीज शेख, उपायुक्त अशोक नाईकवाडे. डॉ. सुभाष जाधव, प्रशासन अधिकारी दिपक धनगर, महापालिका सचिव प्राजक्ता कुलकर्णी, जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे, लेखा परिक्षक शरद देशमुख, मुख्य लेखा परिक्षक किरण भिलारे, नगररचनाकार सहायक संचालक ललीत खोब्रागडे, अग्निशमन अधिकारी बाळासाहेब नेटके, मुख्य सुरक्षा अधिकारी सचिन वानखेडे, आपत्ति व्यवस्थापन अधिकारी यशवंत सगळे, दिव्यांग विभागप्रमुख राजेश घनघाव, क्रीडा अधिकारी शांताराम चौधरी यांच्यासह महापालिका कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Cultural and Sports Festival of Ulhasnagar Municipal Schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.