अभयारण्यातील जनावरांच्या जीवावर उठली संचारबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 12:59 AM2020-04-26T00:59:05+5:302020-04-26T00:59:11+5:30

चारा पाण्याच्या शोधात रानोमाळ हिंडणाऱ्या वन्यजीव, पशूपक्षांची जिल्ह्यातील अभयारण्यात मोठ्याप्रमाणात शिकार केली जात आहे.

A curfew has been imposed on the animals in the sanctuary | अभयारण्यातील जनावरांच्या जीवावर उठली संचारबंदी

अभयारण्यातील जनावरांच्या जीवावर उठली संचारबंदी

Next

सुरेश लोखंडे 
ठाणे : लॉकडाउन काळात लागू केलेल्या संचारबंदीचा गैरफायदा घेऊन रखरखत्या उन्हात चारा पाण्याच्या शोधात रानोमाळ हिंडणाऱ्या वन्यजीव, पशूपक्षांची जिल्ह्यातील अभयारण्यात मोठ्याप्रमाणात शिकार केली जात आहे. शिवाय या शिकारींच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात जंगलांना वनवे लावून जनावरांचा जीव घेतला जात आहे. शनिवारी सकाळीच दबा धरून बसलेल्या शिकाऱ्यांनी एक हरणीचा जीव घेतला. तानसा अभयारण्यात घडलेल्या या घटनेसह एकापाठोपाठ तीन घटना जिल्ह्यात घडल्या आहेत.
वटवाघुळातील कोरोनापासून जीव वाचवता यावा, लागण होऊन कोणाचा नाहक बळी जाऊ नये, यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. जंगलातील पशूपक्षांना या संसर्गाची लागण होऊ नये, यासाठी जंगलात जाण्यासही बंदी आहे. मात्र, या सक्तीच्या संचारबंदीला न जुमानता काहींनी जंगलातील पशूपक्षांच्या शिकारीची मनमानी सुरू केली आहे. शिकार करण्यासाठी जंगलात वणवे ही लावण्याच्या दुर्दैवी घटना जंगलात घडत आहेत.
शनिवारी सकाळीच तानसा अभयारण्यात भेकर जातीच्या हरणाची शिकार केल्याची दुर्दैवी व माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. या घटनेची चाहूल लागताच वनाधिकारी व कर्मचाºयांनी शिकारींना शिताफीने अटक केली.
याशिवाय लागोपाठ याच अभयारण्यात अन्यही शिकारीच्या दोन घटना घडल्याच्या वृत्तास वन परीक्षेत्र अधिकारी रघुनाथ चन्ने यांनी दुजोरा दिला.
>लावा पक्ष्याचीही शिकार
या हरणाच्या शिकारीतील अटक केलेले आरोपी शहापूर तालुक्यामधील मौजे टहारपूर, डिंभे येथील असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोमवारी भिवंडीच्या सांगाव, देवचोळे येथील वनक्षेत्रात रानडुकराची शिकार करण्यात आली. या घटनेतील दोघांना ताब्यात घेतले. तर अन्य दहा ते पंधरा साथीदार फरार आहेत. याशिवाय शहापूर तालुक्यामधील उंबरखांड येथे तिघांना अटक केली आहे. तर अन्य तिघे फरार असून त्यांनी चार लावा पक्ष्यांची शिकार केल्याचे उघडकीस आले. या मृत लावा पक्ष्यासह त्यांच्याकडे शिकारीचे साहित्य आढळून आले असून ते जप्त केल्याचे चन्ने यांनी सांगितले. या शिकारींच्या घटनांच्या तुलनेत जिल्ह्यातील सर्वच जंगलात वणव्याच्या घटनांमध्ये वन्यजीव, पशूपक्षी किडेमकोडे आणि औषधी वनस्पती जळून खाक होत आहेत.
>माळशेज घाटात आगीच्या सात घटना
सध्या सुरू असलेल्या लॉकडाउनचा काळ स्वरक्षणाचा असल्याचे समजून काही महाभाग जंगलात जाऊन वन्यजीवांची हत्या करून पोटभरण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. माळशेज घाट परिसरातील जंगलात अद्याप शिकारीची घटना काही दिवसात घडली नाही. परंतु, आगीच्या पाच ते सात घटना घडल्या असून त्या वेळीच आटोक्यात आणल्याचा दावा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर मांजरे यांनी केला आहे. तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानास लागून असलेल्या येऊरच्या जंगलात शिकारीची व आग लागण्याची घटना घडली नसल्याचा दावा वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पवार यांनी केला आहे.

Web Title: A curfew has been imposed on the animals in the sanctuary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.