जनजागृतीकरिता मीरा-भाईंदर व वसई-विरार पोलीस आयुक्तालया तर्फे वाहतूक पोलिसांची सायकल रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2022 10:18 PM2022-02-24T22:18:37+5:302022-02-24T22:20:01+5:30

२२ किलोमीटरच्या ह्या सायकल रॅली मध्ये महिलांसह एकूण ६० जणानी भाग घेतला होता.

Cycle Rally of Traffic Police on behalf of Mira-Bhayander and Vasai-Virar Police Commissionerate for Public Awareness | जनजागृतीकरिता मीरा-भाईंदर व वसई-विरार पोलीस आयुक्तालया तर्फे वाहतूक पोलिसांची सायकल रॅली

जनजागृतीकरिता मीरा-भाईंदर व वसई-विरार पोलीस आयुक्तालया तर्फे वाहतूक पोलिसांची सायकल रॅली

Next

मीरा रोड : - मीरा-भाईंदर व वसई-विरार पोलिस आयुक्तालयच्या वतीने मीरा भाईंदरमध्ये वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियमांचे पालन लोकांनी करावे व सुरक्षित पाने वाहन चालवावे ह्यासाठी सायकल रॅली चे आयोजन केले होते . 

सायकल रॅलीमध्ये सहपोलीस आयुक्त एस. जयकुमार, उपायुक्त मुख्यालय विजयकांत सागर यांच्यासह सहा पोलीस स्टेशनमधील अधिकारी,अमलदार, कर्मचारी यांनी देखील सहभाग घेतला होता. काशीमीरा पोलीस ठाणे येथून सुरवात होऊन उत्तनची डोंगरी येतुन पुन्हा काशीमीरा नाका असा मार्ग होता .  २२ किलोमीटरच्या ह्या सायकल रॅली मध्ये महिलांसह एकूण ६० जणानी भाग घेतला होता. सायकल वर "वाहतूक नियमांचे पालन करा" असे फलक लावले होते. 

पोलीस उपायुक्त विजय सागर यांनी, फिट इंडियाच्या अनुषंगाने स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासह वाहतूक नियमांचे पालन व वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ही सायकल रॅली आयोजित केल्याचे सांगितले . काही ठिकाणी सायकल ट्रॅक बनवले असून आणखी ट्रॅक बनवण्यासाठी महापालिकेने प्रयत्न केले पाहिजेत अशी भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली .  चालण्यासाठी वॉकिंग प्लाझा सुद्धा लवकर सुरु केले जाणार आहेत .

Web Title: Cycle Rally of Traffic Police on behalf of Mira-Bhayander and Vasai-Virar Police Commissionerate for Public Awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.