उत्स्फुर्त ‘मतदान’साठी सायकल रॅली; ठाणे जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस आयुक्तांनी वेधले लक्ष!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 06:59 PM2019-04-21T18:59:45+5:302019-04-21T19:09:34+5:30
लोकसभेच्या या निवडणुकीत मतदारांना मतदानासाठी आवाहन करणाºया विविध स्वीप उपक्रमापैकी आज सायकल काढून ठाणेकर मतदारांचे लक्ष वेधण्यात आले. ठाणे शहरातून मतदार जनजागृतीसाठी काढण्यात आलेल्या या सायकल रॅलीव्दारे ठाणेकर सायकलपटूंनी मतदानाचा संदेश ठाणेकरांना दिला. जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांच्या सहभागाने या रॅलीला अधिक महत्व आले आणि ठाणेकरांनी त्यास उत्स्फुर्त दाद दिली.
ठाणे : या लोकसभा निवडणुकीतठाणेकर नागरिकांसह जिल्ह्यातील मतदारांनी उत्स्फुर्तपणे मतदान करून आपला हक्क बजवावा, या आवाहनासाठी रविवारी सायंकाळी वाहतूक नियंत्रक विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सायकल रॅली काढली. या रॅलीत जिल्हा निवडणूक अधिकारी तथा ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी देखील सायकल चालवून मतदानासाठी ठाणेकर मतदारांचे लक्ष वेधले.
लोकसभेच्या या निवडणुकीत मतदारांना मतदानासाठी आवाहन करणा-या विविध स्वीप उपक्रमापैकी आज सायकल काढून ठाणेकर मतदारांचे लक्ष वेधण्यात आले. ठाणे शहरातून मतदार जनजागृतीसाठी काढण्यात आलेल्या या सायकल रॅलीव्दारे ठाणेकर सायकलपटूंनी मतदानाचा संदेश ठाणेकरांना दिला. जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांच्या सहभागाने या रॅलीला अधिक महत्व आले आणि ठाणेकरांनी त्यास उत्स्फुर्त दाद दिली.
सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील शासकीय विश्रामगृहासमोरून ही सायकल रॅलीस सुरु झाली. यावेळी जिल्हाधिकारी ठाणे लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निरीक्षक शैली क्रशनानी यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी स्वीप उपक्रमाच्या नोडल अधिकारी रेवती गायकर व उपजिल्हा निवडणूक अधिकारी अपर्णा सोमाणी, ज्येष्ठ सायकलपटू श्यामसुंदर केसरकर, देविदास ठोंबर तसेच अन्य अधिकारी, कर्मचारी व सायकलपटू या ‘मतदान’ जनजागृती सायकल रॅलीत मोठ्यासंख्येने सहभागी झाले. ही सायकल रॅली, कोर्टनाका, टेंभी नाका, जांभळी नाका, गडकरी रंगायतन, राम मारु ती रोड, गोखले रोड, टेलिफ़ोन सर्कल, अलमोडा सिग्नल, खोपट सिग्नल मार्गे पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन या रॅलीचा समारोप करण्यात आला.