अंबरनाथमध्ये राष्ट्रवादीने काढली सिलिंडरची अंत्ययात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:42 AM2021-08-22T04:42:48+5:302021-08-22T04:42:48+5:30
अंबरनाथ : देशात अन्नधान्याच्या महागाईचा उडालेला भडका आणि इंधनाचे दररोज वाढत चाललेले दर, याविरोधात अंबरनाथमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने गॅस सिलिंडरची ...
अंबरनाथ : देशात अन्नधान्याच्या महागाईचा उडालेला भडका आणि इंधनाचे दररोज वाढत चाललेले दर, याविरोधात अंबरनाथमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने गॅस सिलिंडरची शनिवारी अंत्ययात्रा काढण्यात आली.
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलची दरवाढ होत असतानाच आता घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीही वाढल्या आहेत. इंधनाच्या वाढत्या दरांमुळे भाजीपाला, अन्नधान्य अशा सगळ्याच गोष्टींच्या किमती वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक अक्षरशः भरडला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला. याचाच निषेध करण्यासाठी गॅस सिलिंडरची अंत्ययात्रा काढली. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सदाशिव पाटील आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
----------------------------------------------
वाचली