बंजारा समाजाचे आरक्षणासाठी डफडी बजाओ आंदोलन; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 01:37 AM2020-10-16T01:37:51+5:302020-10-16T01:37:58+5:30
राज्य शासनाचे वेधले लक्ष,सरकारदरबारी अनेक पाठपुरावा करूनही बंजारा आरक्षण किंवा क्रिमिलेयर, बढतीमधील आरक्षण, तांडा सुधार आदी प्रश्न सोडविले जात नाही, असा आरोप करून त्यांच्या निषेधार्थ हे आंदोलन केल्याचे सांगितले.
ठाणे : भटक्या-विमुक्तांसह बंजारा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी ऑल इंडिया बंजारा संघाच्या कार्यकर्त्यांनी माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डफडी बजाओ आंदोलन करून राज्य शासनाचे लक्ष वेधले.
शहरातील शासकीय विश्रमगृहाजवळ पार पडलेल्या या आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकत्र्याना मार्गदर्शन करतेवेळी राठोड यांनी सरकारदरबारी अनेक पाठपुरावा करूनही बंजारा आरक्षण किंवा क्रिमिलेयर, बढतीमधील आरक्षण, तांडा सुधार आदी प्रश्न सोडविले जात नाही, असा आरोप करून त्यांच्या निषेधार्थ हे आंदोलन केल्याचे सांगितले.
या आंदोलनात भटके विमुक्त मागासवर्गीय महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अप्पा भालेराव, अमित साळुंखे, रामदास राठोड, जनाबेन राठोड, मीना राठोड, लाला चव्हाण, रवी राठोड, रमेश राठोड, हरी चव्हाण, लक्ष्मण राठोड, पुरीण राठोड, सुंदरभाई, अशोक पवार, शंकर राठोड, गोपाळ पवार आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.