कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने दोन वाहनांसह दुकानांचेही नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 12:49 AM2021-05-24T00:49:25+5:302021-05-24T00:52:40+5:30

घोडबंदर रोडमार्गे ठाणे ते मुंबईकडे जाणाऱ्या एका कंटेनरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या विचित्र अपघातात उभ्या असलेल्या दोन वाहनांसह दोन दुकानांना या कंटेनरची जोरदार धडक बसल्याची घटना रविवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

Damage to shops including two vehicles due to loss of control of the container driver | कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने दोन वाहनांसह दुकानांचेही नुकसान

घोडबंदर रोडवरील घटना

Next
ठळक मुद्देघोडबंदर रोडवरील घटनाचालकाचे पलायन

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: घोडबंदर रोडमार्गे ठाणे ते मुंबईकडे जाणाऱ्या एका कंटेनरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या विचित्र अपघातात उभ्या असलेल्या दोन वाहनांसह दोन दुकानांना या कंटेनरची जोरदार धडक बसल्याची घटना रविवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर चालकाने मात्र कंटेनर सोडून तिथून पलायन केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
जेएनपीटी येथे माल उतरविल्यानंतर पुन्हा ठाण्याच्या दिशेने घोडबंदर रोडने रविवारी सकाळी जाणारा हा रिलायबेल ट्रान्सपोर्ट सर्व्हिस या कंपनीचा कंटेनर ओवळा नाका येथे आला असता, चालकाचे अचानक नियंत्रण सुटले. यात दोन झाडे, रियाज यांच्या न्यू गरीब नवाज कॅटरर्स आणि नदीम यांच्या ड्रीम मेन्स सलून या दोन दुकानांनाही तो धडकला. त्यानंतर रस्त्यावर उभ्या असलेल्या हार्मोनी रेसिडेन्सी येथील आशिष मिस्त्री आणि कृष्णा साळुंके यांच्या दोन मोटार कारलाही या कंटेनरची धडक बसली. यामध्ये दोन्ही दुकानांसह दोन्ही मोटारकारचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. घटनास्थळी ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या पथकासह वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी मदतकार्य राबविले.
* या घटनेनंतर काही नागरिकांनी या कंटेनर चालकाला मारहाण केली. त्यानंतर तो तिथून पसार झाला. त्याचा कंटेनर मात्र पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. एरव्ही, ओवळा नाका येथे मोठी वर्दळ असते. हा अपघात पहाटेच्या वेळी झाल्याने सुदैवाने यात कोणतीही जिवित हानी झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. अज्ञात चालकाविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Damage to shops including two vehicles due to loss of control of the container driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.