अवकाळी पावसामुळे ठाणे जिल्ह्यातील जिल्हह्यातील २८० हेक्टरवरील फळबांगाचे नुकसान

By सुरेश लोखंडे | Published: March 21, 2023 07:36 PM2023-03-21T19:36:43+5:302023-03-21T19:37:00+5:30

ठाणे : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस व वादळी वारा सुटत आहे. यास अनुसरून मंगळवारी सकाळी ६.३० वाजेदरम्यान ...

Damage to 280 hectares of fruit trees in Thane district due to unseasonal rains | अवकाळी पावसामुळे ठाणे जिल्ह्यातील जिल्हह्यातील २८० हेक्टरवरील फळबांगाचे नुकसान

अवकाळी पावसामुळे ठाणे जिल्ह्यातील जिल्हह्यातील २८० हेक्टरवरील फळबांगाचे नुकसान

googlenewsNext

ठाणे: जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस व वादळी वारा सुटत आहे. यास अनुसरून मंगळवारी सकाळी ६.३० वाजेदरम्यान पडलेल्या अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान झाले आहे. जिल्ह्याभरातील २७३ हेक्टरवरील फळपिकांसह सात हेक्टरवरील बागायती आदी तब्बल २८० हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून शासनाच्या अर्थ सहाय्याची अपेक्षा आहे.

सततच्या बदलत्या हवामानामुळे जिल्ह्यातील वादळीवारा व पाऊस पडत आहे. आज सकाळी सरासरी ७.६० मिमी पाऊस जिल्ह्यात पडला. यामध्ये सर्वाधिक पाऊस भिवंडी तालुक्यात १२ मिमी, तर या खालोखाल अंबरनाथला ९.४० मिमी,कल्याण, उल्हासनगरला प्रत्येकी पाच मिमी. शहपूरला व मुरबाडला प्रत्येकी एक मिमी पाऊस पडला आहे. आजच्या या पावसासह काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील ८८५ शेतकऱ्यांच्या २८० हेक्टरवरील आंब्यासह फळबागांचे नुकसान झाल्याची नोंद घेण्यात आलेली आहे. यानुकसानीमुळे तब्बल ५० लाखांचे नुकसान झाल्याचा आंदाज व्यक्त केला जात आहे. या अवकाळी पावसामुळे अचानक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्यामुळे त्यांच्यात चिंततेचे वातावरण तयार झाले आहे. या नुकसानीस अनुसरून शासनाने तातडीने आर्थिक मदत करण्याची अपेक्षा या शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

या अवकाळी पावसामुळे जिल्हह्यातील कल्याण व अंबरनाथ तालुक्यातील ७.४० हेक्टर बागायतीचे नुकसा झाले आहे. याचा ४९ शेतकºयांना फटका बसला आहे. यामध्ये कल्याणच्या एका शेतकºयांचे शेतीचे नुकसान झाले. तर अंबरनाथमधील ४८ शेतकऱ्यांच्या सात हेक्टरमधील बागायतीचे नुकसान झाले आहे. ३३ टक्केपेक्षा या शेतकºयांचे नुकसान झाल्यामुळे त्यांना नुकसान भरपाईसाठी पात्र ठरवण्यात आले आहे. तर आंब्या सारख्या फळपिकाखाली २७३ हेक्टरचे नुकसान झाले आहे. ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेल्या या ८३६ शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या लाभासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहे. भिवंडीच्या ३१६ शेतकऱ्यांचे सर्वाधिक ११७ हेक्टरचे नुकसान नोंद झाले आहे. तर मुरबाडच्या १७३ शेतकऱ्यांचे ४३.४० हेक्टर, अंबरनाथ तालुक्यातील १५७ शेतकऱ्यांचे ५३ हेक्टर, शहापूरच्या १८९ शेतकऱ्यांचे ५३.४२ हेकटरवरील नुकसानीची व मीरा भाईंदरच्या एका शेतकऱ्याचे तीन हेक्टरवरील फळबागाच्या नुकसानीची नोंद घेण्यात आलेली आहे.

Web Title: Damage to 280 hectares of fruit trees in Thane district due to unseasonal rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.