धरणातील पाणीसाठा वाढला

By admin | Published: July 6, 2017 06:11 AM2017-07-06T06:11:28+5:302017-07-06T06:11:28+5:30

जिल्ह्यात आतापर्यंत ९८० मिमी पाऊस झाला आहे. पावसाळ्यातील संपूर्ण पावसाच्या सरासरीच्या हे प्रमाण सरासरीच्या ४० टक्के आहे.

The dam's water storage increased | धरणातील पाणीसाठा वाढला

धरणातील पाणीसाठा वाढला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यात आतापर्यंत ९८० मिमी पाऊस झाला आहे. पावसाळ्यातील संपूर्ण पावसाच्या सरासरीच्या हे प्रमाण सरासरीच्या ४० टक्के आहे. यामुळे धरणातील पाणीसाठाही झपाट्याने वाढून पाणीटंचाईची समस्या कमी झाली आहे.
सर्व तालुक्यांत मिळून जुलैअखेरपर्यंत सरासरी १००६.४१ मिमी पाऊस असतो. तो ३ जुलैपर्यंत या सरासरीच्या जवळपास १०० टक्के (९८०.७९ मिमी) पाऊस झाला आहे.
गेल्या वर्षी याच सुमारास ही सरासरी ६३७ मिमी होती. तालुकानिहाय आतापर्यंत ठाणे परिसरात १०५७ मिमी, शहापूरला ९३६.१०, मुरबाड- ९७२ भिवंडी- ९६६, कल्याण- १००८, उल्हासनगर- १०१३ आणि अंबरनाथला ९१३.४० मिमी पाऊस पडला आहे. यामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठ्यातही मोठी वाढ झाली आहे. बारवी धरणातही ५७ टक्के, तानसात ५७.४४, मोडक सागर ६०.७, आंध्रा २८.६१, भातसा ४९.९८ टक्के पाणीसाठा तयार झाला आहे.

Web Title: The dam's water storage increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.