मंदिरामधील दानपेटी लंपास
By admin | Published: June 30, 2017 02:45 AM2017-06-30T02:45:11+5:302017-06-30T02:45:11+5:30
गेल्या काही दिवसांपासून शेलार गावात भुरट्या चोऱ्या वाढल्या असून मुख्य रस्त्यावर असलेल्या मारूतीच्या देवळातील दानपेटी चोरांनी लंपास केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : गेल्या काही दिवसांपासून शेलार गावात भुरट्या चोऱ्या वाढल्या असून मुख्य रस्त्यावर असलेल्या मारूतीच्या देवळातील दानपेटी चोरांनी लंपास केली.
तालुक्यातील शेलार ग्रामपंचायत हद्दीतील दोन घरातील कुटुंब गाढ झोपेत असताना दरवाजाची कडी उघडून किमती सामान व मोबाइल चोरीस गेले. तर शुभारंभ पार्क वसाहतीतील दुचाकी चोरीची घटना घडली आहे. भिवंडी-वाडा मार्गावरील शेलार गावातील हनुमान मंदिरात चोरी झाल्याचे उघडकीस आले. या परिसरात ग्रामपंचायतीने सीसीटीव्ही कॅमेरे लावले असून त्यामध्ये बिघाड झाल्याचे आढळले.
शेलार ते कवाड हा परिसर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असून या परिसरातील घटनेची नोंद करण्यासाठी शेलार चौकी बांधलेली आहे. परंतु या चौकीत पोलीस कर्मचारी बसत नसल्याने
नागरिकांना तक्रारीसाठी तहसीलच्या आवारातील तालुका पोलीस ठाण्यात यावे लागते, असे येथील नागरिकांनी सांगितले.