घाणीच्या साम्राज्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात, नागरिक त्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2017 10:40 PM2017-11-13T22:40:25+5:302017-11-13T22:40:47+5:30
साठलेल्या कचरा व घाणीच्या साम्राज्यामुळे परिसरांतील सहा शाळेच्या विद्यार्थ्यांचे व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असुन याकडे स्वच्छता अधिका-यांनी व स्थानिक नगरसेवकांनी दुर्लक्ष केले आहे.
भिवंडी : शहरातील नवीवस्ती येथील गौतम कंपाऊण्डमध्ये साठलेल्या कचरा व घाणीच्या साम्राज्यामुळे परिसरांतील सहा शाळेच्या विद्यार्थ्यांचे व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असुन याकडे पालिकेच्या स्वच्छता अधिका-यांनी व स्थानिक नगरसेवकांनी दुर्लक्ष केले आहे.
पालिकेच्या प्रभाग समिती क्र .३ मधील प्रभाग क्र.१५च्या कार्यक्षेत्रातील कल्याणरोड येथील गौतम कंपाऊण्ड,बिहारी चाळ या भागात ग्लोरी हायस्कुल(इंग्रजी),सरस्वती हायस्कुल,पालिकेच्या शाळा क्र.६८(उर्दु),शाळा क्र.६०,५७ व ६७(मराठी,तामीळ व तेलुगू)अशा सहा शाळा असुन परिसरांतील हजारो विद्यार्थी या शाळांमध्ये शिकत आहेत.तसेच या भागात सुमारे वीस-पंचवीस हजाराची कामगार वस्ती आहे.असे असताना या भागातील अस्वच्छतेने कहर केला आहे.या भागातील नाले व गटारे वर्षानुवर्षे साफ न केल्याने घाणीने भरलेले आहेत. त्याच प्रमाणे शाळेत जाण्यासाठी असलेला रहदारीचा रस्ता गेल्या काही वर्षापासून न बनविल्या मुळे नादुरूस्त रस्त्यावरून विद्यार्थ्यांना व नागरिकांना चालणे कठीण झाले आहे.या भागात कचरा उचलला जात नसल्याने घाणीचे साम्राज्या पसरले आहे.तसेच जंतूनाशक औषधांची फवारणी केली जात नाही.तसेच या भागातील भिशीत(खाणावळ)यंत्रमाग कामगारांना नाईलाजाने जेवण करावे लागत आहे.अस्वच्छतेमुळे परसरलेल्या रोगराईने त्रस्त नागरिक अक्षरश: नरकयातना भोगत असताना पालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.तर नगरसेवकांकडे तक्रार करूनही त्यांनी पाठ फिरवली आहे.त्यामुळे पालिका आयुक्त योगेश म्हसे आणि उपायुक्त (स्वच्छता)विनोद शिंगटे यांनी या भागाची पहाणी करून ही समस्या दूर करावी,अशी मागणी पारसिरांतील नागरिकांनी लेखी पत्राव्दारे केली आहे. (प्रतिनीधी)(सोबत फोटो आहे.)
-------------------------------------------------------
चौकट-गेल्या पाच वर्षापासून या भागातील रस्ते व गटारे दुरूस्त केल्याची नोंद पालिकेत आहे.मात्र प्रत्यक्षात या परिसरांत कोणतेच काम झालेले माही,अशी माहिती माजी नगरसेवक नासीर सय्यद यांनी दिली.
--------------------------------------------------