टोइंगमध्येही दुजाभाव; पोलिसांच्या गांड्यांना अभय

By admin | Published: April 10, 2017 05:48 AM2017-04-10T05:48:33+5:302017-04-10T05:48:33+5:30

शहरातील वाहतूकीस अडथळा आणणाऱ्या वाहनांवर ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेमार्फत कारवाईचा

Danger in toying; Police raid Abhay | टोइंगमध्येही दुजाभाव; पोलिसांच्या गांड्यांना अभय

टोइंगमध्येही दुजाभाव; पोलिसांच्या गांड्यांना अभय

Next

ठाणे : शहरातील वाहतूकीस अडथळा आणणाऱ्या वाहनांवर ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेमार्फत कारवाईचा बडगा उगारला असताना, मात्र, पोलिसांच्या वाहनांवर कारवाई करताना वाहतूक पोलिसांकडून दुजाभाव होत असल्याचे चित्र ठाण्यात पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे पोलीस लिहा आणि वाहन टोईंग होण्यापासून वाचा असेच म्हणावे लागेल.
शहर वाहतूक पोलिसांच्या ताफ्यात असलेल्या १८ टोर्इंग व्हॅन बेकायदा पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई करतात. दुचाकी उचलल्यावर १०० रुपयांच्या पावतीसह व्हॅन चालकाला १०० असे २०० रुपये दुचाकीचालकांकडून आकारले जातात. त्यामुळे टोईंग वाहनांवरील कर्मचारी जणून दरोडा टाकावा त्याप्रमाणे वाहनांची उचलेगिरी जणू काही टार्गेट असल्याप्रमाणे करतात. पंरतू पोलीस असे पुसट जरी लिहीलेले अक्षर दिसले किंवा पोलीस दलाचे स्टिकर लावलेल्या वाहनांना हे, उचलेगिरी करणारे व्हॅन वरील कर्मचारी हे वाह नको रे बाबा असे म्हणत सर्वसामान्यांचे एखादे वाहन दिसते का याकडे डोळ्यात तेल टाकून त्याकडे कानाडोळा करतात.
मध्यंतरी कल्याणात वाहन उचलून नेणाऱ्या टोर्इंग व्हॅनचा पाठलाग करताना एका वाहन चालकाचा मृत्यू झाला. त्यानंतर, या व्हॅनचा मनमानी कारभार वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. त्यावेळी वाहन उचलण्यापूर्वी उद्घोषणा क रा, फोट
ो काढा अशा सुचना वाहतूक विभागामार्फत व्हॅन मालक-कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. मात्र, ते नियम धाब्यावर बसवले जात आहेत.
त्यातच बेकायदा पार्क केलेल्या पोलिसांच्या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा झाला तरी चालेल. पण, ती उचलायची नाही असा दम त्यांना भरला आहे की काय असा प्रश्न या निमित्त उपस्थित होऊ लागला आहे. (प्रतिनिधी)

व्यापाऱ्यांची वाहनेही कारवाईविना
असे प्रकार प्रामुख्याने ठाणे शहरातील नौपाडा, स्टेशन परिसर, बाजारपेठ आदी ठिकाणी पाहण्यास मिळत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांकडून आम्ही पण वाहनांवर पोलीस लिहून वाहन कुठेही पार्र्किंग करायचे का असाही प्रश्न विचारला जात आहे. व्यापारी स्वत:ची वाहने लावून जागा अडवतात. ते चालते. त्यामुळे सर्वांना समान न्याय असावा, अशी मागणी ठाणेकर नागरिकांकडून होऊ लागली आहे.

Web Title: Danger in toying; Police raid Abhay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.