भिवंडीत धोकादायक इमारतीस तडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 11:52 PM2019-08-31T23:52:03+5:302019-08-31T23:54:11+5:30

संसार आला रस्त्यावर । १८ कुटुंबीयांना सुरक्षितस्थळी हलवले

Dangerous building collapse in the ceiling | भिवंडीत धोकादायक इमारतीस तडे

भिवंडीत धोकादायक इमारतीस तडे

Next

भिवंडी: भिवंडीत मागील आठवड्यात बेकायदा इमारत दुर्घटनेची घटना ताजी असतानाच शुक्र वारी सायंकाळी पुन्हा एकदा गैबीनगर येथे ४२ वर्षे जुन्या धोकादायक इमारतीस तडे गेल्याने तब्बल १८ कुटुंबीयांना सुरक्षितस्थळी हलवून इमारत पालिकेने रिकामी केली.

शांतीनगर भागातील गैबीनगर येथील फैजूल उलम मदरसा ट्रस्टच्या मालकीच्या मशिदीची सुन्नी जामा मशीद, चाळ घरक्र मांक ७९२ ही तब्बल ४२ वर्षे जुनी दोन मजली इमारत आहे. ही इमारत पालिका प्रशासनाने सप्टेंबर २०१६ मध्ये धोकादायक ठरवली होती. त्याचबरोबर या इमारतीची वीज व पाणीजोडणीही कापली होती. मात्र, या इमारतीवर कारवाई करण्यास नागरिकांनी तेव्हा विरोध करत आपण स्वत: ही इमारत पाडण्याचे आश्वासन येथील भाडोत्रींनी दिले होते. मात्र, तीन वर्षांनंतरही हे भाडोत्री याच इमारतीत तळ ठोकून बसले होते.
शुक्र वारी दुपारी अचानक धोकादायक असलेल्या या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील स्लॅबचे प्लास्टर पडल्याने मशिदीमधून ध्वनिक्षेपकावरून नागरिकांना इमारत रिकामी करण्यासाठी आवाहन करण्यात आले. त्यानंतर, या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आयुक्त अशोककुमार रणखांब यांच्या आदेशानुसार पोलीस व कर्मचारी पथकासह घटनास्थळी दाखल झाले. या इमारतीमधील १८ खोल्यांमधील ४२ वर्षांपासून भाडोत्री म्हणून वास्तव्य करणाºया कुटुंबीयांना शांतीनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ममता डिसोझा यांच्या पथकाच्या मदतीने घरातील साहित्य बाहेर काढण्यास सांगून इमारत रिकामी करण्यास सांगितली.
इमारतीचा वीजपुरवठा व नळजोडणी खंडित करण्यात आली. यानंतर इमारतीतील भाडोत्रींनी गरजेच्या वस्तू हलवण्यास सुरुवात केली. मात्र, या घटनेत तब्बल १८ कुटुंबे बेघर झाली असून तीन वर्षांपासून इमारतमालक, ट्रस्टी व भाडोत्री यांच्यात जागेचा ताबा सोडण्यावरून वाद सुरू असल्याची माहिती मिळत असून इमारत पाडल्यानंतर नवी इमारत उभी करून घर परत मिळेल का, या विवंचनेत या इमारतीतील रहिवासी आहेत. तब्बल ४२ वर्षे या इमारतीमध्ये राहिल्यानंतर अचानक इमारत सोडून जायचे कुठे, असा सवाल या इमारतीमधील नागरिक विचारत आहेत.

तीन वर्षांपासून कारवाई प्रस्तावित
दरम्यान, या इमारतीवर तीन वर्षांपासून कारवाई प्रस्तावित असून याबाबत इमारतमालकांवर गुन्हाही दाखल झालेला असल्याची माहितीही मिळत आहे. इमारत दुर्घटना व त्यामुळे होणारी हानी टाळावी, यासाठी भविष्यातील धोका ओळखून इमारत रिकामी करून वापर थांबवला आहे, अशी प्रतिक्रि या आयुक्त अशोककुमार रणखांब यांनी दिली.

Web Title: Dangerous building collapse in the ceiling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.