मुंब्र्यात धोकादायक इमारतीच्या रुमचा स्लँब कोसळला
By कुमार बडदे | Published: June 28, 2023 09:15 PM2023-06-28T21:15:47+5:302023-06-28T21:16:16+5:30
दुर्घटना घडली त्यावेळी घरात किंवा त्या इमारतीमध्ये कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला.
मुंब्रा - येथील रेतीबंदर परीसरातील रमाबाई या इमारतीच्या तिस-या मजल्या वरील रुम नंबर २५ च्या हाँलचा स्लँब बुधवारी दुपारी कोसळला. तळ अधिक तीन मजली ही इमारत धोकादायक इमारतीच्या यादीतील असून ती इमारती या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रिकामी करण्यात आली होती. त्यामुळे दुर्घटना घडली त्यावेळी घरात किंवा त्या इमारतीमध्ये कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला.
ही ३५ वर्षे जुनी असून त्यामध्ये एकूण २३ रूम आणि तळ मजल्यावर तीन गाळे आहेत. धोकादायक यादीत असल्यामुळे ही इमारत रिकामी करण्यात आली असली तरी राहिवाशांचे संसार उपयोगी साहित्य त्या घरात होते. स्लॅब पडल्याची माहिती मिळताच मुंब्रा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पुढील कार्यवाहीसाठी सहाय्यक आयुक्तांनी संबंधित विभागाला माहिती दिली आहे. अशी माहिती ठामपाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातील अधिका-यांनी दिली.