मुंब्य्रातील धोकादायक इमारती : हजारो रहिवासी सोशल मीडियामुळे दहशतीखाली- कुमार बडदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 06:50 AM2018-05-07T06:50:29+5:302018-05-07T06:50:29+5:30
मुंब्य्रातील धोकादायक तसेच अतिधोकादायक इमारतींच्या यादीतील सर्वच इमारतींवर कारवाई होणार असून ऐन रमझान महिन्यात हजारो नागरिक रस्त्यावर येणार असल्याचा मेसेज काही व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल झाला आहे. अर्धवट माहितीच्या आधारे व्हायरल झालेल्या या मेसेजेचा फटका मुंब्य्रातील धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या हजारो रहिवाशांना बसला आहे.
मुंब्रा : मुंब्य्रातील धोकादायक तसेच अतिधोकादायक इमारतींच्या यादीतील सर्वच इमारतींवर कारवाई होणार असून ऐन रमझान महिन्यात हजारो नागरिक रस्त्यावर येणार असल्याचा मेसेज काही व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल झाला आहे. अर्धवट माहितीच्या आधारे व्हायरल झालेल्या या मेसेजेचा फटका मुंब्य्रातील धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या हजारो रहिवाशांना बसला आहे. त्यामुळे हे रहिवासी दोन दिवसांपासून दहशतीखाली वावरत आहेत.
अशा १४६० इमारतींची यादी सध्या फिरते आहे. पालिकेने मात्र फक्त दहा इमारती तोडल्या जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
ठाणे महापालिकेने नुकतीच विविध प्रभाग समितीअंतर्गत धोकादायक तसेच अतिधोकादायक इमारतींची यादी घोषित केली. त्यात मुंब्य्रातील १४६० इमारतींचा समावेश आहे. कोणत्या श्रेणीत किती इमारती आहेत, किती इमारती त्वरित तोडण्याची आवश्यकता आहे, किती इमारती दुरूस्त होऊ शकतात, याची कोणत्याही प्रकारची खातरजामा न करता यादीतील सर्वच इमारतींवर कारवाई होणार असून, यामुळे ऐन रमझान महिन्यात हजारो नागरिक रस्त्यावर येणार आहेत, अशा आशयाचा मेसेज काही व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल झाला आहे. या मेसेजमुळे ज्या इमारतींची नावे धोकादायक इमारतींच्या यादीत आहेत, त्या बहुतांशी सर्वच इमारतींमधील रहिवासी मानसिक तणावाखाली वावरत आहेत. दरम्यान, मुंब्य्रातील अतिधोकादायक अशा केवळ १० इमारती या पावसाळ्यापूर्वी तोडण्यात येणार आहेत. यामुळे दुरूस्त होऊ शकणाºया सी २ ए (इमारत रिकामी करु न तिची दुरूस्ती करणे), सी २ बी (रहिवाशांनी वास्तव्य करतानाच ती दुरूस्त करणे) आदी गोष्टींची माहिती घ्यावी.
कार्यवाहीचे काही निकष
ज्या इमारतींचा समावेश या यादीत होतो, त्यावरील कार्यवाहीची एक पद्धत असते. त्याचेही काही निकष असतात. त्यामुळे रहिवाशांनी घाबरून जाऊ नये.
या इमारतींमधील रहिवाशांनी कोणत्याही प्रकारचा ताण न घेता घाबरु न न जाता, त्या इमारतींच्या श्रेणीनुसार दुरूस्ती करून घ्यावी, असे आवाहन अधिकाºयांनी केले आहे.
ठाणे महापालिकेने घोषित केलेल्या मुंब्य्रातील १,४६० इमारतींपैकी अतिधोकादायक अशा फक्त १० इमारती पावसाळ्यापूर्वी तोडण्यात येणार आहेत. त्यातील सात इमारतींना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
- झुंजार परदेशी, सहाय्यक आयुक्त,
मुंब्रा प्रभाग समिती.