भंगार गाड्यांमुळे काळ्या-पिवळ्या जीपचा धोका

By admin | Published: May 3, 2017 05:42 AM2017-05-03T05:42:53+5:302017-05-03T05:42:53+5:30

कल्याण-मुरबाड मार्गावर आरटीओच्या आशीर्वादाने दावणाऱ्या खाजगी काळया-पिवळ््या जीपपैकी अनेक भंगात निघालेल्या

Dangers of black-yellow jeep due to scrap carts | भंगार गाड्यांमुळे काळ्या-पिवळ्या जीपचा धोका

भंगार गाड्यांमुळे काळ्या-पिवळ्या जीपचा धोका

Next

कल्याण : कल्याण-मुरबाड मार्गावर आरटीओच्या आशीर्वादाने दावणाऱ्या खाजगी काळया-पिवळ््या जीपपैकी अनेक भंगात निघालेल्या असूनही त्यात क्षमतेपेक्षा अदिक प्रवासी कोंबले जात असल्याने हा प्रवास जीवघेणा होत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. तक्रार करूनही कल्याण आरटीओ कार्यालयाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
कल्याण-मुरबाडदरम्यानचे अंतर ३० किलोमीटर आहे. त्या मार्गावर एसटी सोडल्या जातात. पण प्रवाशांच्या संख्येच्या तुलनेत त्या अफुऱ्या पडतात. अनेक बस वेळेवर धावत नाहीत. शिवायत्यातील अनेक गाड्या थेट मुरबाडला जात असल्याने मधील गावांत उतरणाऱ्यांची गैरसोय होते. शिवाय माळशेज घाटमार्गे नगर आणि अन्य लांबच्या प्रवासाला दर १५ मिनिटांनी जाणाऱ्या गाड्यांत या प्रवाशांना चढू दिले जात नाही. कंडक्टरकडून मुरबाडच्या प्रवाशांना मज्जाव केला जातो. तसेच मध्यल्या स्टॉपवर उतरणारे प्रवासी घेतले जात नाही. मुरबाडहून महाविद्यालयात शिक्षण घेणारे, कामानिमित्त कल्याण, मुंबई, ठाणे, नवी मुंबईला जाणारे अनेक कामगार, शेतकरी, व्यापारी येत असतात. त्यांना बस वेळेवर मिळत नाही. त्यामुळे नाईलाजाने प्रवासी बसऐवजी काळ््या-पिवळ््या जीपचा आधार घेतात.
कल्याण पश्चिमेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळून ज्या जीप सुटतात. एका जीपमध्ये चालक धरुन नऊ प्रवासी बसतात. त्यात एका प्रवाशाकडून ३५ ते ४० रुपयांचे भाडे घेतले जाते. तरीही जादा नफा कमावण्याच्या उद्देशाने जीप चालकांकडून जास्तीचे प्रवासी कोंबले जातात. अशी प्रवासी वाहतूक करणाऱ्या अनेक जीपला सिग्नलचे दिवे नाहीत. अनेक गाड्यांना नीट काचा नाहीत. गाड्यांचे पत्रे गंजलेले आहेत. बसण्यासाठी नीट सीट नाहीत. गाड्यांचे टायर घासून गुळगुळीत झालेले आहे. काही टायर तर शिलाई मारुन तसेच चालविले जात आहेत.
प्रवासी राजू वाघमारे यांनी सांगितले, पैसे घेऊनही चांगल्या जीप चालविल्या जात नाही. त्यामुळे प्रवाशांना धोका आहे. (प्रतिनिधी)

एकाचवेळी सर्व जीप बंद करणे कठीण

१मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपच्या विरोधात तक्रारी येत आहेत. सात जीपगाड्यांविरोधात कारवाई केली आहे. त्यापैकी दोन जीपचालकांनी त्यांच्या परवान्यांचेही नुतनीकरण केलेले नसल्याचे उघड झाले आहे, अशी माहिती आरटीओ अधिकारी नंदकिशोर नाईक यांनी दिली.

२कारवाई केलेल्या जीप कल्याण बस डेपोत उभ्या करुन ठेवल्या आहेत. कल्याण-मुरबाड मार्गावर जवळपास २२ जीपचालक व्यवसाय करतात. या सगळ््या गाड्या बंद केल्यास प्रवाशांचीच गैरसोय होईल. एकाच वेळी कारवाई करणे शक्य नाही. पण सगळ््या गाड्यांचा तांत्रिक फिटनेस तपासला जाणार आहे, असे ते म्हणाले.

भंगार जीपसाठी प्रवाशांना नुकसानभरपाई नाही!
या जीपचालकांना किशोर, गोवेली, मामनोली या गावचे प्रवासीही मिळतात. तरी हव्यासापोटी जास्तीचे प्रवासी भरुन वाहतूक केली जाते. जीप चालकांकडून दर वर्षाला १२ हजार रुपयांचा विमा काढला जातो.
जीपच्या धडकेत प्रवासी जखमी झाला, तर मोटार वाहन अपघात दाव्यानुसार संबंधित विमा कंपनीकडून प्रवाशाला अपघात नुकसानभरपाई मिळते अशा नियम असला तरी नुकसानभरपाई मिळालेली प्रकरणे दुर्मिळ आहेत.
जीपची धडक लागणाऱ्या प्रवाशाला विमा मिळतो. भंगार जीपमधून प्रवास करताना त्याला अपघात झाला; त्याच्या जीवाचे बरेवाईट झाले, तर त्याला नुकसानभरपाई मिळण्याची तरतूद नसल्याचे वाघमारे यांनी नमूद केले.

Web Title: Dangers of black-yellow jeep due to scrap carts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.