दापोडा आग प्रकरणी गुन्हा दाखल नाही

By admin | Published: February 22, 2017 04:48 AM2017-02-22T04:48:33+5:302017-02-22T04:48:33+5:30

तालुक्यातील दापोडा गावात मोती कारखान्यास लागलेल्या आग प्रकरणी ४८ तास उलटूनही कारखाना मालकावर

Dapoda does not file an FIR in the fire case | दापोडा आग प्रकरणी गुन्हा दाखल नाही

दापोडा आग प्रकरणी गुन्हा दाखल नाही

Next

भिवंडी : तालुक्यातील दापोडा गावात मोती कारखान्यास लागलेल्या आग प्रकरणी ४८ तास उलटूनही कारखाना मालकावर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. या आगीमध्ये चार जणांनी प्राण गमावले आहेत.
मोती कारखान्यात जळालेल्या कामगारांची डीएनए चाचणी करून त्यांची नावे व वारस ठरविण्यासाठी, तसेच पोलिसांनी कारखाना मालक अजय देडिया याला ताब्यात न घेता, केवळ कामगारांचे जबाब घेतले. कारखान्यात कोणतीही आगप्रतिबंधक साधने नव्हती. असे असूनही पोलीस गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई करीत असल्याचा आरोप होत आहे.
दरम्यान, मालकाच्या वतीने मृतांच्या वारसांना पाच लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन दिल्याने कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार केले. (प्रतिनिधी)

Web Title: Dapoda does not file an FIR in the fire case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.