दशमेश कंपनीला लागली भीषण आग; अंबरनाथच्या आनंद नगर एमआयडीसीमधील घटना
By पंकज पाटील | Updated: July 12, 2023 20:12 IST2023-07-12T20:10:44+5:302023-07-12T20:12:19+5:30
या आगीत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.

दशमेश कंपनीला लागली भीषण आग; अंबरनाथच्या आनंद नगर एमआयडीसीमधील घटना
अंबरनाथ : अंबरनाथ पूर्व भागातील आनंदनगर एमआयडीसीमध्ये सायंकाळच्या सुमारास एका कंपनीला भीषण आग लागली आहे. दशमेश असे या कंपनीचा नाव असून या कंपनीमध्ये जीन्स कपडा आणि फॉम् कंपनीत बनत होते. आज सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास या कंपनीमध्ये भीषण आग लागली.
त्यामुळे ही कंपनी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच अंबरनाथच्या एमआयडीसी भागातील अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्यासाठी बदलापूर अंबरनाथ अग्निशमनदारांकडून आठ गाड्या या ठिकाणी दाखल झाले असून आग विझवण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र या आगीत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.