मुलीने प्रियकराच्या मदतीने केली वडिलांची फसवणूक
By admin | Published: May 7, 2017 05:42 AM2017-05-07T05:42:04+5:302017-05-07T05:42:04+5:30
वडिलांनी विश्वासाने ठेवण्यास दिलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम मुलीने प्रियकराच्या मदतीने लंपास केली. एकूण आठ लाखांचा
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : वडिलांनी विश्वासाने ठेवण्यास दिलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम मुलीने प्रियकराच्या मदतीने लंपास केली. एकूण आठ लाखांचा ऐवज चोरीला गेल्याचे संतोष तुपे यांच्या लक्षात आले. त्यांनी हिललाइन पोलीस ठाण्यात मुलगी व तिच्या प्रियकराविरोधात तक्रार केली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील कॅम्प नं.-५ परिसरात तुपे यांचे गॅरेज आहे. त्यांनी मुलीच्या लग्नासाठी व कुटुंबाच्या भविष्यासाठी जमा केलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम मुलगी नम्रता हिच्याकडे मोठ्या विश्वासाने ठेवण्यास दिली. मुलीने वडिलांना न सांगता प्रियकर विनय ढोबळे याच्याकडे दीड महिन्यापासून सोन्याचे दागिने देत गेली. काही कामानिमित्त तुपे यांनी नम्रताकडे पैसे मागितल्यावर खरा प्रकार उघड झाला. मुलीच्या वागण्याने वडिलांना धक्का बसला. त्यांनी हिललाइन पोलीस ठाणे गाठून मुलगी व तिच्या प्रियकराविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
संतोष यांनी १२ हजार रोख, २ लाख १२ हजारांचे सोन्याचे ३ ब्रेसलेट, ८७,५०० च्या ७ सोन्याच्या अंगठ्या, २ लाख २५ हजारांच्या सहा सोन्याच्या बांगड्या, सोेन्याचा हार, ३ जोड कर्णफुले असा एकूण ७ लाख ९९ हजार ५०० रुपयांचा ऐवज नम्रता हिच्याकडे विश्वासाने दिला होता. त्याच पैसे व सोन्यातून मुलीच्या लग्नाचे स्वप्न ते पाहत होते. मात्र, मुलीनेच फसवणूक केली.