ठाण्यातील तीन रस्त्यांच्या भूमिपूजनाला भाजपाच्या नगरसेवकांना डावलले, शिवसेनेने केला कार्यक्रम हायजॅक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2017 04:29 PM2017-10-05T16:29:11+5:302017-10-05T16:29:36+5:30
राज्यात एकीकडे सत्तेत राहून विरोधाची भुमिका शिवसेनेकडून बजावली जात आहे. परंतु ठाण्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेने भाजपाचीच कोंडी करण्याचे प्रयत्न सुरु केल्याची बाब समोर आली आहे.
ठाणे - राज्यात एकीकडे सत्तेत राहून विरोधाची भुमिका शिवसेनेकडून बजावली जात आहे. परंतु ठाण्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेने भाजपाचीच कोंडी करण्याचे प्रयत्न सुरु केल्याची बाब समोर आली आहे. वागळे इस्टेट भागातील तीन रस्त्यांचे युटीब्डब्युटी पध्दतीने काम करण्यात येणार असून, त्याचा भुमिपुजन सोहळा गुरुवारी पार पडला. परंतु या सोहळ्याला भाजपाच्या स्थानिक नगरसेवकांची संख्या अधिक असतांना देखील शिवसेनेच्या मंडळींनी हा कार्यक्रमच हायज्ॉक केल्याची माहिती समोर आली आहे.
वागळे इस्टेट भागातील रस्ते युटीडब्ल्युटी पध्दतीने तयार करण्यात येणार आहेत. यामध्ये वागळेचा मुख्य रस्ता क्रमांक 33, 34 आणि रोड नं. 22 या तीनही रस्त्यांचा भुमीपुजन सोहळा ठाणो जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी, गटनेते दिलीप बारटक्के, स्थानिक नगरसेवक एकनाथ भोईर, प्रकाश शिंदे, एकता भोईर आदी मंडळी उपस्थित होते. परंतु प्रत्यक्षात या भागात शिवसेनेचा केवळ एकच नगरसेवक असून भाजपाचे विलास कांबळे, सुवर्णा कांबळे आणि केवलादेवी यादव हे तीन नगरसेवक आहेत. प्रत्यक्षात हा कार्यक्रम पालिकेचा असल्याने पालिकेने या नगरसेवकांना देखील निमत्रंण देणो अपेक्षित होते. परंतु त्यांनी आम्हाला निमत्रंण दिलेच नसल्याची माहिती भाजपाच्या एका नगरसेवकाने दिली. शिवसेनेने हा कार्यक्रम हायजेक केल्याचा आरोपही या मंडळींनी आता केला आहे. परंतु शिवसेना नेत्याच्या विरोधात बोलण्यास मात्र यातील कोणीही नगरसेवक तयार नसल्याचे दिसून आले. यामागे शिवसेनेच्या मंडळींची दहशत हे कारण असल्याची माहिती समोर आली आहे. एकूणच या रस्त्याच्या निमित्ताने शिवसेनेने ठाण्यात आता भाजपाला टारगेट करण्यास सुरवात केल्याचेच दिसत आहे. राज्यात सत्तेत राहून विरोध करायचा आणि ठाण्यात सत्तेत राहून विरोधी बाकावर असलेल्या भाजपाची कोंडी करायची अशीच काहीशी रणनिती आता तयार होत असल्याचे दिसत आहे.