उल्हासनगरात राष्ट्रवादीकडून दावते-ए-इफ्तारचे आयोजन
By सदानंद नाईक | Published: April 17, 2023 04:33 PM2023-04-17T16:33:15+5:302023-04-17T16:33:26+5:30
कॅम्प नं-३ येथील सम्राट अशोकनगर येथे राष्ट्रवादीच्या वतीने रविवारी दावते-ए-इफ्तारचे आयोजन करण्यात आले.
उल्हासनगर- कॅम्प नं-३ येथील सम्राट अशोकनगर येथे राष्ट्रवादीच्या वतीने रविवारी दावते-ए-इफ्तारचे आयोजन करण्यात आले. यावेळी माजी आमदार पप्पु कलानी यांच्यासह पक्षाचे स्थानिक नेते व पदाधिकारी उपस्थित होते.
उल्हासनगर राष्ट्रवादी पक्षाच्या शहरजिल्हाध्यक्षा पंचम ओमी कलानी यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे प्रवक्ते शिवाजी रगडे, नगरसेविका सविता तोरणे (रगडे), नगरसेवक गजानन शेळके, फिरोज खान, महेश आहुजा व संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सम्राट अशोकनगर मध्ये रविवारी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार पप्पू कलानी आवर्जून उपस्थित होते. सम्राट अशोकनगर सुन्नी जामा मस्जिद, रेणुका सोसायटी मस्जिद, संजय गांधी नगर मस्जिद आदीमधील सर्व ट्रस्टी व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इफ्तार पार्टीला रिपाइंचे नेते व माजी नगरसेवक महादेव सोनवणे, जमील खान, कमलेश निकम, रामेश्र्वर गवई, दशरथ चौधरी, अखलाख खान, इस्माईल भाई, मन्सूर भाई, आसिफ भाई, शरीफ भाई, रजी अहमद भाई, मोनू सिद्दीकी, नीतेश राजपूत, तोसिफ शेख यांच्यासह मुस्लिम बांधव उपस्थित असल्याची माहिती शिवाजी रगडे यांनी दिली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते शिवाजी रगडे यांनी सम्राट अशोकनगर मध्ये राहत असलेला सर्व समाज बांधव गोडीगुलाबीने राहत असल्याचे सांगितले.