दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरच्या पोलीस कोठडीत 14 ऑक्टोबरपर्यंत वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2017 07:34 PM2017-10-10T19:34:45+5:302017-10-10T19:35:07+5:30

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरसह तीन आरोपींची पोलीस कोठडी 14 ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने मंगळवारी त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. 

Dawood Ibrahim's brother Iqbal Kaskar's police custody extended till October 14 | दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरच्या पोलीस कोठडीत 14 ऑक्टोबरपर्यंत वाढ 

दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरच्या पोलीस कोठडीत 14 ऑक्टोबरपर्यंत वाढ 

Next

ठाणे : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरसह तीन आरोपींची पोलीस कोठडी 14 ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने मंगळवारी त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. 
इक्बाल कासकर, मुमताज इजाज शेख आणि इसरार जमीर अली सैयद यांना खंडणीच्या तीन गुन्ह्यांमध्ये खंडणी विरोधी पथकाने गेल्या महिन्यात अटक केली होती. कासकरच्या मोबाईल फोनचा सीडीआर (कॉल्सचा तपशील) पोलिसांनी संबंधित कंपनीकडून मागविला होता. जवळपास वर्षभराचा हा सीडीआर असून, त्याद्वारे कासकरच्या नियमित संपर्कात असलेल्या काही संशयास्पद मोबाईल नंबर्सची पडताळणी तपास यंत्रणा करीत आहे. या व्यतिरिक्त कासकरने यापूर्वी आणखी काही सीम कार्डस्चा वापर केला असावा, असा पोलिसांना संशय आहे. त्या सीम कार्डस्चे नंबर शोधून तपास करण्यासाठी पोलिसांनी कासकरसह तिन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली. कासकरच्या जुन्या सीम कार्डचे नंबर मिळाल्यास त्याआधारे आरोपींचे आणखी काही हस्तक आणि नियमित संपर्कातील व्यक्तींची नावे समोर येऊ शकतील, असा पोलिसांना विश्वास आहे. 
जागेच्या वादातून आरोपींनी ठाण्यातील एका सराफा व्यावसायिकाकडून 40 तोळे सोने खंडणीच्या स्वरूपात बळकावले होते. त्यापैकी जवळपास निम्मे सोने पोलिसांनी वसूल केले. उर्वरित सोने वसूल करण्यासाठी आरोपींची चौकशी करण्याची गरज असल्याचा मुद्दाही पोलिसांनी न्यायालयासमोर मांडला. न्यायालयाने पोलिसांची बाजू ग्राह्य धरून तिन्ही आरोपींची पोलीस कोठडी 14 ऑक्टोबर्पयत वाढविली. 

Web Title: Dawood Ibrahim's brother Iqbal Kaskar's police custody extended till October 14

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.