पोलीस दिनानिमित्त देशभरातील शहीद पोलिसांना ठाण्यात मानवंदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 10:26 PM2018-10-21T22:26:39+5:302018-10-21T22:34:33+5:30

ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातर्फे रविवारी सकाळी ठाणे ग्रामीण पोलीस कार्यालयाजवळील उद्यानात पोलीस स्मृती दिन साजरा झाला. वर्षभरामध्ये देशभरात शहीद झालेल्या ४२३ पोलिसांना यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पोलिसांनी आदरांजली वाहिली. यामध्ये महाराष्टÑाच्या हवालदार सुनिल कदम, सुरेश गावडे आणि सतिश मढवी यांचाही समावेश होता.

 On the day of the police, the martyrs of police across the country are honored in Thane | पोलीस दिनानिमित्त देशभरातील शहीद पोलिसांना ठाण्यात मानवंदना

देशभरातील ४२३ शहीदांना आदरांजली

Next
ठळक मुद्देदेशभरातील ४२३ शहीदांना आदरांजलीपालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली मानवंदनाशहीद पोलीस कुटूंबियांचीही उपस्थिती

ठाणे: पोलीस दिनानिमित्त देशभरातील ४२३ शहीद पोलिसांना ‘स्मृती स्तंभाला’ पुष्पचक्र वाहून ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी सकाळी मानवंदना दिली. सकाळी ८ ते ८.२० या दरम्यान झालेल्या या कार्यक्रमास जिल्हयातील शहीद पोलीस कुटूंबियांसह अनेक वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
लडाखमधील भारताच्या बर्फाच्छादित सीमेवरील हॉटस्प्रिंग याठिकाणी २१ आॅक्टोबर १९५९ रोजी १० पोलीस जवान गस्त घालत होते. त्यावेळी दबा धरुन बसलेल्या चिनी सैनिकांनी त्यांच्यावर भ्याड हल्ला केला. या हल्ल्याला भारतीय जवानांनीही जशास तसे उत्तर देत अखेरच्या क्षणापर्यंत झुंज दिली. या हल्ल्यात दहा जवान शहीद झाले. या घटनेचा संपूर्ण देशात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला होता. भारतीय जवानांच्या अतुलनीय शौर्यापासून इतरांना प्रेरणा मिळावी, कर्तव्याची आणि राष्टÑनिष्ठेची जाणीव व्हावी, म्हणून हा दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो.
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातर्फे रविवारी सकाळी ठाणे ग्रामीण पोलीस कार्यालयाजवळील स्व. निर्मलादेवी चिंतामणी दिघे उद्यानात पोलीस स्मृती दिन साजरा झाला. वर्षभरामध्ये देशभरात शहीद झालेल्या ४२३ पोलिसांच्या नावांचे वाचन आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संजय जाधव यांनी केले. पालकमंत्री शिंदे यांनी शहीद स्तंभाला पुष्पचक्र वाहून मानवंदना दिल्यानंतर ठाण्याचे खासदार राजन विचारे, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, सह पोलीस आयुक्त मधुकर पांडेय, कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक नवल बजाज, ठाण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रविण पवार (गुन्हे शाखा), केशव पाटील (प्रशासन),प्रताप दिघावकर (पूर्व प्रादेशिक विभाग) तसेच ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक महेश पाटील, पोलीस उपायुक्त डी. एस. स्वामी (ठाणे), संजय शिंदे (कल्याण), प्रमोद शेवाळे (उल्हासनगर), अविनाश अंबुरे (वागळे इस्टेट), दिपक देवराज (गुन्हे शाखा), अमित काळे (वाहतूक नियंत्रण शाखा) आणि मुख्यालयाचे संदीप पालवे आदींसह शहीद पोलिसांच्या कुटूंबियांनीही स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली.ठाण्यात रविवारी मान्यवरांनी पोलीस स्मृती स्तंभास मानवंदना दिल्यानंतर मुख्यालयातील जवानांनी हवेत फैरी झाडून शहीद पोलिसांना मानवंदना दिली.
..................
४२३ शहिदांमध्ये महाराष्टÑातील तिघे
गेल्या वर्षभरामध्ये देशभरात ४२३ पोलीस अधिकारी कर्मचारी शहीद झाले. यामध्ये महाराष्टÑाच्या मुंबई पोलीस दलातील हवालदार सुनिल कदम, गडचिरोलीचे हवालदार सुरेश गावडे आणि अमरावती ग्रामीणच्या सतिश मढवी यांचा उल्लेख यावेळी करण्यात आला.

Web Title:  On the day of the police, the martyrs of police across the country are honored in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.