लॉकडाऊनमध्येही ‘दे दारू’; दुकाने बंद तरीही विक्री जोरात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:42 AM2021-05-27T04:42:23+5:302021-05-27T04:42:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : एकीकडे कोरोनामुळे राज्यभर लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे अनेक दुकाने बंद आहेत. त्यामुळे व्यापारी आणि ...

‘De Daru’ also in lockdown; Shops closed, sales still high! | लॉकडाऊनमध्येही ‘दे दारू’; दुकाने बंद तरीही विक्री जोरात!

लॉकडाऊनमध्येही ‘दे दारू’; दुकाने बंद तरीही विक्री जोरात!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : एकीकडे कोरोनामुळे राज्यभर लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे अनेक दुकाने बंद आहेत. त्यामुळे व्यापारी आणि विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे, तर दुसरीकडे मद्याची केवळ ऑनलाइन विक्री सुरू झाली. दरम्यान, केवळ मद्यविक्रीच्या लायसन्स नूतनीकरणाद्वारे २४५ कोटींचा महसूल राज्य शासनाला ठाणे जिल्ह्यातून मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली, तर तीन कोटी ७० लाख ८९ हजार ६७९ लिटर देशी-विदेशी मद्याची विक्रीही झाली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, ठाण्यासह राज्यभर कडक निर्बंध केले आहेत. त्यात मद्यविक्रीची दुकानेही बंद ठेवली आहेत. त्याऐवजी ऑनलाइन घरपोच मद्यविक्रीसाठी अनुमती दिली आहे. सध्या तरी २१ एप्रिल २०२१ पासून दुकानातून मद्यविक्रीला बंदी केली आहे. अवैधरीत्या दारू विक्री, तसेच निर्मिती करणाऱ्यांवर भरारी पथकांसह जिल्ह्यातील ११ विभागांच्या निरीक्षकांनी ठाण्याचे अधीक्षक नितीन घुले आणि उपअधीक्षक चारू हांडे यांच्या अधीपत्याखालील पथकांनी कारवाई केली आहे.

* महसूलला मद्याचा आधार!

गेल्या वर्षी कडक लॉकडाऊन असल्यामुळे मद्यविक्रीची दुकानेही बंद होती. त्यामुळे अनेक विक्रेत्यांनी आपल्या दुकानांची अनुज्ञप्ती (लायसन्स) परवाना नूतनीकरण केला नव्हता. यंदा मात्र आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच लॉकडाऊन शिथिल होताच अनेकांनी अनुज्ञप्ती नूतनीकरण केले. जिल्हाभरातून अशा १७०० मद्य विक्रीच्या व्यावसायिकांनी परवाना नूतनीकरण केले. त्याद्वारे तब्बल २४५ कोटींचा महसूल ठाणे उत्पादन शुल्क विभागाच्या मार्फतीने शासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे.

...............................

तीन कोटी लिटर दारू रिचवली

२०२०-२१

.................

३,७०,८९,६७९ लिटर मद्य

.................................

२०२०-२१

२,९३,९२,५८९ लिटर बीअर

.....................................

देशी दारू - १, ५८,३१,६०७

विदेशी- २, १२,५८,०७२

बीअर- २,९३,९२, ५८९

....................................

* बीअरची विक्री घटली,

विदेशीची वाढली...

१. ठाणे जिल्ह्यातील मद्य विक्रीच्या दुकानांमध्ये एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या कालावधीमध्ये एक कोटी ५८ लाख ३१ हजार ६०७ लिटर देशी दारूची विक्री झाली.

२. तर दोन कोटी १२ लाख ५८ हजार ७२ लिटर विदेशी मद्य विक्री झाले.

३. त्यापाठोपाठ दोन कोटी ९३ लाख ९२ हजार ५८९ लिटर बीअरची विक्री झाली. त्याचवेळी सात लाख ५८ हजार ९०५ लिटर वाइन विक्री झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

...........................

‘सध्या राज्य शासनाने ऑनलाइनद्वारे घरपोच मद्य विक्रीला परवानगी दिली आहे. गेल्या वर्षभरात अवैधपणे मद्यविक्री करणाऱ्या १८०० आरोपींची धरपकड करण्यात आली. सुमारे आठ कोटींची दारू आणि मुद्देमाल जप्त केला आहे.

नितीन घुले, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, ठाणे.

...............................

* आठ कोटीची दारू जप्त

गेल्या वर्षभरात बेकायदेशीरपणे देशी-विदेशी दारूची विक्री करणारे, तसेच निर्मिती करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विविध पथकांनी कारवाई केली. यामध्ये जिल्हाभर दोन हजार २६ कारवाया करण्यात आल्या आहेत. या कारवाईमध्ये आठ कोटींची दारू, तसेच २२० वाहने आणि मद्यनिर्मितीसाठी लागणारे हजारो लिटर रसायन जप्त करण्यात आले. या कारवायांमधून जवळपास १८०० आरोपींवर अटकेची कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: ‘De Daru’ also in lockdown; Shops closed, sales still high!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.