भिवंडीतील कुहे गावातील निवारा शेडच्या आगीत ११ बकऱ्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 08:42 PM2018-06-22T20:42:28+5:302018-06-22T20:50:35+5:30

The death of 11 elephants in the fire of a shelter in the Khewar village of Bhiwandi | भिवंडीतील कुहे गावातील निवारा शेडच्या आगीत ११ बकऱ्यांचा मृत्यू

भिवंडीतील कुहे गावातील निवारा शेडच्या आगीत ११ बकऱ्यांचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्दे बक-यांच्या शेडला आग लागल्याने ११बक-यांचा होरपळून मृत्यूआग विझविताना त्यांचा मुलगा सचिन ठाकरे (२२)हा देखील भाजला ही आग शॉर्टसर्किटने लागली कि मच्छरांसाठी लावण्यात आलेल्या धुरामुळे

भिवंडी : तालुक्यातील कुहे गावातील भंडारपाडा या आदिवासी वसाहतीत बक-यांच्या शेडला आग लागल्याने ११बक-यांचा होरपळून मृत्यू झाला असून तीन बक-या गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवारी पहाटे घडली आहे.या प्रकरणी उशीरा नोंद घेऊन पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
कुहे गावातील भंडारपाडा येथे माधव पदू ठाकरे यांचे शेळी निवाराशेड असून  या शेडला लागलेल्या आगीने शेळीपालन व्यावसायीक चिंताग्रस्त झाले आहेत. माधव ठाकरे यांनी शेतीला जोडधंदा म्हणून शेळी पालनचा व्यवसाय सुरु केला होता.त्यांच्याकडे एकूण ३० बक-या होत्या. या बक-यांसाठी त्यांनी घराच्या बाजूलाच निवाराशेड उभारली होती. तसेच लाकडी माच तयार केला होता. आज पहाटेच्या वेळी अचानक या निवारा शेडला आग लागली. या आगीत ११ बक-यांचा होरपळून मृत्यू झाला तर ३ बक-या जळून गंभीर जखमी झाल्या आहेत. ही आग शॉर्टसर्किटने लागली कि मच्छरांसाठी लावण्यात आलेल्या धुरामुळे लागली,हे आद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.या आगीची घटना समजताच माधव ठाकरे यांनी कुटूंबासह घटनास्थळी धाव घेवून आग विझविण्याचा प्रयत्न केला.आग विझविताना त्यांचा मुलगा सचिन ठाकरे (२२)हा देखील भाजला आहे.या घटनेची माहिती मिळताच कुहे गावच्या सरपंच निराबाई भुरे ,पं. स. सदस्य रेखा उघडा ,तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुनिल मुंढे ,पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी आर.आर.पाटील या पथकाने घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.यावेळी शेळी पालन शेतक-याला शासनाने आर्थिक मदत द्यावी, यासाठी पंचनामा करून तहसीलदार शशिकांत गायकवाड यांना अहवाल सादर केला आहे.

Web Title: The death of 11 elephants in the fire of a shelter in the Khewar village of Bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.