निवडणूक कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 04:26 AM2019-04-29T04:26:59+5:302019-04-29T04:27:13+5:30
महापालिकेतील शिपाई भगवान मगरे यांचा निवडणुकीचे काम करताना रविवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. सी ब्लॉक येथील मतदान केंद्रात ते काम करत होते.
उल्हासनगर : महापालिकेतील शिपाई भगवान मगरे यांचा निवडणुकीचे काम करताना रविवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. सी ब्लॉक येथील मतदान केंद्रात ते काम करत होते. मृतदेह त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. उल्हासनगर महापालिकेत शिपाई म्हणून कार्यरत असलेले मगरे यांना लोकसभा निवडणुकीचे काम देण्यात आले होते. सकाळी निवडणूक साहित्य घेतल्यानंतर कॅम्प नं.-३, सी ब्लॉक येथील मीनल चव्हाण विद्यालयातील मतदान केंद्रे-८७ मध्ये मगरे सहकाऱ्यांसोबत गेले होते.
दुपारी मतदारसंघात निवडणुकीचे काम करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. बेशुद्ध पडलेल्या मगरे यांना मध्यवर्ती रु ग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ही माहिती निवडणूक निर्णय अधिकारी, पालिका आयुक्त, पोलीस व कुटुंबाला देण्यात आली. पोलिसांनी हृदयविकाराच्या झटक्याने मगरे यांचा मृत्यू झाल्याचे सांगून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
भिवंडी येथे बुधवारी पोलिसांचा मृत्यू
भिवंडी लोकसभा मतदारसंघातील निवडणूक बंदोबस्ताकरिता नेमणूक केलेल्या दशरथ कोरडे (५७) या निजामपूर पोलीस ठाण्यातील पोलिसाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. कोरडे हे निवडणूक बंदोबस्त करत असताना अचानक त्यांची तब्येत बिघडली. त्यांना तातडीने इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर, पुढील उपचारासाठी ठाणे-कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना बुधवारी सकाळी ते मरण पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. निजामपूर पोलीस ठाण्यात शनिवारी या घटनेची नोंद करण्यात आली.