पेस्ट कंट्रोलच्या वासामुळे ठाण्यात बालिकेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:41 AM2021-03-16T04:41:21+5:302021-03-16T04:41:21+5:30

ठाणे : पेस्ट कंट्रोलच्या वासामुळे ठाण्यात ऋत्वी पालशेतकर या चार वर्षीय बालिकेचा रविवारी सायंकाळी मृत्यू झाल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी ...

Death of a girl in Thane due to the smell of pest control | पेस्ट कंट्रोलच्या वासामुळे ठाण्यात बालिकेचा मृत्यू

पेस्ट कंट्रोलच्या वासामुळे ठाण्यात बालिकेचा मृत्यू

Next

ठाणे : पेस्ट कंट्रोलच्या वासामुळे ठाण्यात ऋत्वी पालशेतकर या चार वर्षीय बालिकेचा रविवारी सायंकाळी मृत्यू झाल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद पोलिसांनी केली आहे.

घोडबंदर रोड येथील डेफोडील सोसायटीमधील रहिवासी राजू पालशेतकर यांच्या घरी १३ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास पेस्ट कंट्रोल करण्यात आले होते. हे पेस्ट कंट्रोल केल्यानंतर राजू यांची पत्नी आणि मुलगी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घरात गेले. त्या वेळी पेस्ट कंट्रोलच्या उग्र वासामुळे १४ मार्च रोजी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास ऋत्वी हिला उलटी झाली. त्यांच्या पत्नीलाही मळमळ सुरू झाली. त्यामुळे दोघींनाही तत्काळ जवळच्याच एका खासगी रुग्णालयात सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान ऋत्वी हिचा रविवारी सायंकाळी मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयाने पोलिसांना दिली. सहायक पोलीस निरीक्षक आर.बी. फड हे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Death of a girl in Thane due to the smell of pest control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.