गरम चटणीत पडून दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 05:47 AM2018-02-21T05:47:05+5:302018-02-21T05:47:08+5:30
अंबरनाथ शास्त्रीनगर भागात मंगळवारी पहाटे एका दीड वर्षांच्या चिमुकलीचा विचित्र अपघात घडला. घरात तयार केलेल्या चटणीच्या मोठ्या टोपात ती खेळता खेळता पडली.
अंबरनाथ : अंबरनाथ शास्त्रीनगर भागात मंगळवारी पहाटे एका दीड वर्षांच्या चिमुकलीचा विचित्र अपघात घडला. घरात तयार केलेल्या चटणीच्या मोठ्या टोपात ती खेळता खेळता पडली. टोपात गरम चटणी होती. त्यात पडून ८० टक्के भाजल्याने तिला लागलीच उपचारासाठी दाखल केले.मात्र तिचा दुपारी मृत्यू झाला.
शास्त्रीनगरातील रामास्वामी यांच्या घरात हा प्रकार घडला. रामास्वामी हे इडली -वडा विकण्याचा व्यवसाय करतात. दररोजप्रमाणे ते पहाटे ४ वाजता उठून इडली,वडा,सांबर आणि टोमॅटोची चटणी तयार करतात. मंगळवारीदेखील त्यांनी टोमॅटोची चटणी मोठ्या टोपात तयार केली होती. तो टोप त्यांनी घरातच एका कोपºयात ठेवला होता. याचवेळी पहाटे ५ वाजता त्यांची मुलगी तनुष्का ही खेळत खेळत त्या टोपाजवळ आली. टोपात वाकून बघत असतांना ती त्यातच पडली. तिचा चेहºयाचा भाग थेट त्या टोपात गेला. हा प्रकार कळताच तिला लागलीच रुग्णालयात हलविले. सकाळी तिच्यावर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारदेखील सुरू झाले. मात्र, दुपारी १ वाजता तिचा मृत्यू झाला.