१८ रुग्णांचा मृत्यू ही घटना दुर्दैवी; चौकशीत हलगर्जीपणा आढळल्यास दोषींवर कारवाई: मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2023 09:05 AM2023-08-15T09:05:44+5:302023-08-15T09:10:40+5:30

विनाकारण कोणावरही कारवाई केली जाणार नाही.

death of 18 patients is unfortunate action against culprits of laxity found in inquiry | १८ रुग्णांचा मृत्यू ही घटना दुर्दैवी; चौकशीत हलगर्जीपणा आढळल्यास दोषींवर कारवाई: मुख्यमंत्री

१८ रुग्णांचा मृत्यू ही घटना दुर्दैवी; चौकशीत हलगर्जीपणा आढळल्यास दोषींवर कारवाई: मुख्यमंत्री

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील १८ रुग्णांचे मृत्यू ही घटना दुर्दैवीच आहे. इथे शेकडो - हजारो पेशंट येतात. क्रिटिकल पेशंट बरे होऊन घरीदेखील जातात. या घटनेच्या चौकशीमध्ये कोणी दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल. तसेच, रुग्णालयाची आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी ६० कोटींची तरतूद करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात दिली. 

विनाकारण कोणावरही कारवाई केली जाणार नाही, उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे खच्चीकरण होणार नाही, हेही पाहिले जाईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. चौकशीत तथ्य आढळल्यास मृतांच्या नातेवाइकांना भरपाईदेखील दिली जाईल.  येत्या २५ ऑगस्टपर्यंत चौकशी पूर्ण करण्याचे आदेश दिल्याचेही ते म्हणाले. उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे खच्चीकरण होणार नाही.

 

Web Title: death of 18 patients is unfortunate action against culprits of laxity found in inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.