परम मित्रचे माधव जोशी यांचे निधन

By प्रज्ञा म्हात्रे | Published: June 13, 2024 04:55 PM2024-06-13T16:55:42+5:302024-06-13T16:58:33+5:30

राष्ट्रीय विचारांचा जागर सर्वदुर व्हावा, या हेतुने स्थापन केलेल्या परम मित्र पब्लिकेशनच्या माध्यमातुन अनेकानेक राष्ट्रीय विचार आणि ऐतिहासिक संदर्भाचा उहापोह करणाऱ्या लेखकांच्या पुस्तकांना समाजासमोर मांडले.

Death of Param Mitra Madhav Joshi | परम मित्रचे माधव जोशी यांचे निधन

परम मित्रचे माधव जोशी यांचे निधन

ठाणे : परम मित्र पब्लिकेशनचे संस्थापक तथा अभाविपचे माजी पूर्णकालिक कार्यकर्ते माधव जोशी यांचे बुधवारी  मध्यरात्री अल्पशः आजाराने निधन झाले. ते ६६ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा आणि एक मुलगी आहे. 

गुरुवारी सकाळी ठाण्यातील जवाहर बाग स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी क्षेत्रीय प्रचार प्रमुख प्रमोद बापट, माजी नगरसेवक संजय वाघुले, प्रकाशन आणि पत्रकारिता क्षेत्रातील काही मान्यवरांसह आप्त, मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अभाविपचे पुर्णकालीन कार्यकर्ते म्हणून माधव जोशी यांनी १९८२ ते १९८७ या काळात मुंबई तसेच गुजरात, राजकोट येथे कार्य केले.

दरम्यान, राष्ट्रीय विचारांचा जागर सर्वदुर व्हावा, या हेतुने त्यांनी स्थापन केलेल्या परम मित्र पब्लिकेशनच्या माध्यमातुन अनेकानेक राष्ट्रीय विचार आणि ऐतिहासिक संदर्भाचा उहापोह करणाऱ्या लेखकांच्या पुस्तकांना समाजासमोर मांडले. यात छत्रपती शिवाजी महाराज, रामायण, महाभारत, लोकमान्य टिळकांच्या आठवणी, अहिल्याबाई होळकर तसेच हिंदु दहशतवाद : एक थोतांड, अयोध्या आंदोलनाचा ताळेबंद आदी अनेक लिखित व मराठीत अनुवादीत पुस्तकांचा समावेश आहे. अत्यंत मनमिळावु,मृदु स्वभावाचे माधव जोशी यांच्या निधनाने साहित्य क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे.

Web Title: Death of Param Mitra Madhav Joshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.