ठाण्यात उड्डाणपुलावरून पडल्याने एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 12:20 AM2019-06-05T00:20:59+5:302019-06-05T00:21:04+5:30

घातपात की आत्महत्या? : मृत्यूबाबत गूढ वाढले

Death of one due to falling from the flyover in Thane | ठाण्यात उड्डाणपुलावरून पडल्याने एकाचा मृत्यू

ठाण्यात उड्डाणपुलावरून पडल्याने एकाचा मृत्यू

Next

ठाणे : गोल्डन डाईजनाका ते कॅसलमीलकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावरून पडून सुमारे ४५ ते ५० वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी १० वा. च्या सुमारास घडली. प्राथमिक अंदाजानुसार ही आत्महत्या असल्याचे राबोडी पोलिसांनी सांगितले. मात्र, हा घातपात, अपघात की आत्महत्या आहे, याबाबतही उलटसुलट चर्चा सुरू होती.

अगदी अलिकडेच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी उद्घाटन झालेल्या नव्या कोºया कॅसलमील उड्डाणपुलावरून ४ जून रोजी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी ही मध्यमवयीन व्यक्ती अचानक खाली कोसळली. चालत्या दुचाकीवरून तो कोसळल्याचा सुरुवातीला अंदाज व्यक्त होत होता.

मात्र, राबोडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, त्यावेळी पुलावर साधे घसरल्याचे एकही निशाण नव्हते, की कोणतेही वाहन वर किंवा खाली कोसळलेले नव्हते. त्यामुळे या व्यक्तीने खाली उडी मारून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम सूर्यवंशी यांनी सांगितले. अंगात आकाशी रंगाचा शर्ट, पांढरे बनेल आणि राखाडी रंगाची फूल पॅन्ट असलेली ही व्यक्ती डोक्यावर पडल्यामुळे डोक्याच्या भागाचा अक्षरश: चेंदामेंदा झाला होता. त्यामुळे खाली कोसळताच त्याचा अवघ्या काही वेळातच जागीच मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत त्याची ओळख पटलेली नव्हती.

तर्कवितर्कांना ऊत, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
राबोडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून उड्डाणपुलावर कोणतेही वाहन न आढळल्याने या प्रकरणाचे गूढ अधिकच वाढले आहे. अपघात झाला असेल तर वाहन नाही. किंवा दुसºया एखाद्या वाहनावरुन तो कोसळल्यानंतर ते वाहन निघून गेले असावे. किंवा कोणीतरी वरुनच त्याला ढकलून दिले असावे, असे अनेक तर्कवितर्क केले जात आहेत. जवळपासच्या दुकान आणि इमारतींचेही सीसीटीव्ही चित्रण तपासले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याआधीही एक मृत्यू
चार महिन्यांपूर्वी गोकूळनगर येथून खोपट एसटी स्टॅन्ड आणि जेल तलावाच्या दिशेने जाणाºया या कॅसलमील उड्डाणपुलाचे लोकार्पण झाले. उद्घाटनानंतर २४ तासातच भरधाव वेगाने जाणाºया मोटारसायकलस्वाराचा या पुलावर मृत्यू झाला होता. मंगळवारी सकाळी या पुलावरून स्व. माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे चौकात ही व्यक्ती खाली कोसळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: Death of one due to falling from the flyover in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.