ठाण्यात विजेच्या धक्क्याने टीएमटी बसथांब्यावर प्रवाशाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 10:16 PM2018-10-08T22:16:54+5:302018-10-08T22:28:17+5:30

भांडूप येथील आपल्या घरी जाण्यासाठी ठाण्यातील खोपटच्या टीएमटी थांब्यावर उभे असलेल्या प्रवाशाला वीजेच्या धक्का लागल्याने त्याचा सोमवारी दुपारी मृत्यु झाल्याची घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Death of a passenger on the bus stand at the Thane TMT bus stand | ठाण्यात विजेच्या धक्क्याने टीएमटी बसथांब्यावर प्रवाशाचा मृत्यू

..तर टीएमटीच्या जाहिरात ठेकेदारावर होणार कारवाई

googlenewsNext
ठळक मुद्देखोपट बस थांब्यावरील घटनानौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..तर टीएमटीच्या जाहिरात ठेकेदारावर होणार कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : खोपट येथील ठाणे परिवहनसेवेच्या थांब्यावर बसची वाट पाहत बसलेल्या दोस मोहम्मद सलमानी (४०, रा. भांडुप) या सलून व्यावसायिकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली. बसथांब्यावरील जाहिरात फलकामधील वीजपुरवठा करणाऱ्या वाहिनीमुळे हा धक्का त्याला बसल्याचे बोलले जात असून यात नेमका कोणाचा दोष आहे, याचा तपास सुरू असल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले.
सलमानी याला हृदयविकाराचा झटका आल्याचीही चर्चा होती. त्यामुळे शवविच्छेदन अहवालानंतर त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकेल, असे नौपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी सांगितले. उथळसर येथील एका सलूनमध्ये कामाला असलेले सलमानी घरी जाण्यासाठी या बसथांब्यावर दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास उभे होते. त्याचदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
थांब्यावर असलेल्या नागरिकांमुळे हा प्रकार उघडकीस आला. या थांब्यावरील जाहिरात फलकामध्ये वीजपुरवठा केला असून हा पुरवठा करणाºया वाहिनीतून वीज थांब्यामध्ये उतरली. त्यामुळे शॉक लागून त्याचा मृत्यू झाल्याची चर्चा परिसरात होती. ठाणे जिल्हा शासकीय रु ग्णालयात त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. ठाण्यातील आंबेडकरनाका परिसरात त्याचे सलून होते. आठवडाभर दुकानातच वास्तव्य करून सोमवारी सुटीच्या दिवशी तो घरी जायचा. सोमवारी नेहमीप्रमाणे बसची वाट पाहत असताना त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, विजेचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात समोर आले, तर संबंधित जाहिरात ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती टीएमटीचे व्यवस्थापक संदीप माळवी यांनी दिली.
-----------------
 

Web Title: Death of a passenger on the bus stand at the Thane TMT bus stand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.