अंबरनाथच्या मुख्य रिक्षा स्टँडवर झाड पडल्याने एका चालकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 01:07 AM2019-06-29T01:07:52+5:302019-06-29T06:53:53+5:30
अंबरनाथ पूर्व विभागातील मुख्य रिक्षा स्टँड च्या लगत असलेला एक झाड पावसामुळे स्टँडच्या कार्यालयावर पडले.
अंबरनाथ - अंबरनाथ पूर्व विभागातील मुख्य रिक्षा स्टँड च्या लगत असलेला एक झाड पावसामुळे स्टँडच्या कार्यालयावर पडले. या कार्यालयाच्या बाहेर बसलेल्या एका रिक्षाचालकाला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. रिक्षा चालकाचे नाव अद्यापही स्पष्ट झालेले नाही.
अंबरनाथ पूर्व भागातील रेल्वे स्थानकाला लागूनच असलेल्या मुख्य रीक्षा स्टँडच्या कार्यालयावर वृक्ष पडल्याने हा अपघात घडला आहे. याच ठिकाणी वीज वितरण विभागाचे विद्युत तार असल्याने चालू लाईनीवर हे वृक्ष पडल्याने त्या चालकाला विजेचा धक्का लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अपघातानंतर विजेची वाहिनी सुरूच राहिल्याने या रिक्षाचालकाला वाचविण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. घटनेच्या वेळी शेजारी असलेल्या पोलीस चौकी मध्ये देखील एकही पोलीस कर्मचारी उपस्थित नव्हता. त्यामुळे बचाव कार्य करण्यास विलंब लागत. विजेची वाहिनी बंद करेपर्यंत संबंधित रिक्षाचालकाने आपला जीव गमावला होता. या घटनेची माहिती मिळताच रिक्षाचालकांनी घटनास्थळी धाव घेत आपला संताप व्यक्त केला. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने हा अपघात घडला आहे.
Thane: 3 people injured after a tree fell at a rickshaw stand at Shivaji Chowk in Ambarnath following heavy rainfall yesterday. #Maharashtrapic.twitter.com/VTwxtJVBG6
— ANI (@ANI) June 28, 2019