वाहनाखाली चिरडून भटक्या श्वानाचा मृत्यू, चालकांविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 12:36 IST2021-09-23T12:35:31+5:302021-09-23T12:36:19+5:30
पश्चिमेच्या १५० फुटी मार्गावर प्लेनेटेरिया वसाहती जवळ मोहनलाल शर्मा हे कॅब टॅक्सीचालक राहतात.

वाहनाखाली चिरडून भटक्या श्वानाचा मृत्यू, चालकांविरुद्ध गुन्हा दाखल
मीरारोड - एका वाहन चालकाने बेजबाबदारपणे वाहन चालवून भटक्या श्वनास चिरडून ठार केल्याप्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पश्चिमेच्या १५० फुटी मार्गावर प्लेनेटेरिया वसाहती जवळ मोहनलाल शर्मा हे कॅब टॅक्सीचालक राहतात. रविवार १९ रोजीच्या सायंकाळी बिल्डिंगचा रखवालदार सुनिल सरोजने सांगितले की, नविन बांधकाम चालू असलेल्या जैन मंदिर समोर एक भटक्या कुत्र्याच्या अंगावरुन गाडी गेल्यामुळे तो कुत्रा विव्हळत आहे. शर्मा यांनी त्वरित जाऊन पाहिले असता अंगावरुन वाहन गेल्यामुळे कुत्र्याचा मृत्यू झाला होता. अज्ञात वाहन चालकाविरुध्द बेजबाबदारपणे वाहन चालवून क्रूरतेने कुत्र्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी भाईंदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.