भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा ८; अखेर ४५ तासांनी शोध मोहीम थांबवली

By नितीन पंडित | Published: May 1, 2023 12:23 PM2023-05-01T12:23:49+5:302023-05-01T12:24:14+5:30

इमारतीचा संपूर्ण ढिगारा उपसल्या नंतर तब्बल ४५ तासांनी बचाव पथकाने शोध मोहीम थांबविल्याचे भिवंडी प्रांत अधिकारी अमित सानप यांनी सोमवारी सकाळी जाहीर केले.

Death toll in Bhiwandi building disaster rises to eight; Finally the search mission was called off after 45 hours | भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा ८; अखेर ४५ तासांनी शोध मोहीम थांबवली

भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा ८; अखेर ४५ तासांनी शोध मोहीम थांबवली

googlenewsNext

नितीन पंडित

भिवंडी: वळपाडा येथील वर्धमान कंपाऊंड मध्ये तीन मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना शनिवारी दुपारी घडली होती. रविवारी रात्रीपर्यंत मृतांचा आकडा सहावर होता, सोमवारी सकाळी बचाव पथकाकडून शोध मोहीम पुन्हा सुरू करण्यात आल्यानंतर आणखीन दोन मृतदेह बजाव पथकाने ढिगाऱ्या खालून बाहेर काढली आहेत. अशोक मिश्रा वय २९ वर्ष व दिनेश तिवारी वय ३७ या दोघांचे मृतदेह सोमवारी सकाळी बचाव पथकाने बाहेर काढली आहेत.त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांची एकूण संख्या आठवर पोहोचली आहे.तर ढिगार्‍या खालून एकूण दहा जणांना सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला आधीच यश आले आहे.         

इमारतीचा संपूर्ण ढिगारा उपसल्या नंतर तब्बल ४५ तासांनी बचाव पथकाने शोध मोहीम थांबविल्याचे भिवंडी प्रांत अधिकारी अमित सानप यांनी सोमवारी सकाळी जाहीर केले. येथे काम करणाऱ्या कामगारांचे व त्यांच्या नातेवाईकांकडून आता कोणीही ढिगाराखाली अडकले नसल्याची माहिती व तक्रार पोलीस व बचाव पाठकाकडे केली नसल्याने व संपूर्ण इमारतीचा ढिगारा उपसल्यानंतर ही शोध मोहीम थांबविली असून अजून जर कोणत्याही व्यक्तीबद्दल काही माहिती द्यायची झाल्यास पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन देखील यावेळी सानप यांनी नागरिकांना केले असून ही शोध मोहीम थांबविल्याचे जाहीर केले.         

बचाव पथकाने तब्बल ४५ तास अथक परिश्रम करून ही शोध मोहीम सुरूच ठेवून आठ मृतदेह तर दहा नागरिकांची सुटका केल्याने नागरिकांकडून एनडीआरएफ टीडीआरएफ अग्निशमन दल व बचाव पथकातील इतर कर्मचाऱ्यांचे गुलाब पुष्प देऊन नागरिकांनी कृतज्ञता व्यक्त केली.

मयातांची नावे- 
नवनाथ सावंत वय ३५ वर्ष
लक्ष्मी रवी महतो वय ३२ वर्ष
सोना मुकेश कोरी वय ४ वर्ष 
सुधाकर गवई वय ३४ वर्ष 
प्रमोद चौधरी वय २२ वर्ष 
त्रिवेणी यादव वय ४० वर्ष 
दिनेश तिवारी वय ३७ वर्ष 
अशोक मिश्रा वय २९ वर्ष 

जखमिंची नावे 
सोनाली परमेश्वर कांबळे वय २२ 
शिवकुमार परमेश्वर कांबळे वय अडीच वर्षे
मुख्तार रोशन मंसुरी वय २६
चींकु रवी महतो वर्ष ३ वर्ष
प्रिन्स रवी महतो वय ५ वर्ष
विकासकुमार मुकेश रावल वय १८ वर्ष
उदयभान मुनीराम यादव वय २९
अनिता वय ३०
उज्वला कांबळे वय ३०
सुनील पिसाळ २५

Web Title: Death toll in Bhiwandi building disaster rises to eight; Finally the search mission was called off after 45 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.