भिवंडीतील इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा सहावर

By नितीन पंडित | Published: April 30, 2023 07:25 PM2023-04-30T19:25:49+5:302023-04-30T19:26:11+5:30

२० तासांनंतर एकास सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश,बचाव कार्य सुरूच 

death toll in the building accident in bhiwandi has reached six | भिवंडीतील इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा सहावर

भिवंडीतील इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा सहावर

googlenewsNext

नितीन पंडित, भिवंडी: वळ पाडा येथील वर्धमान इमारत दुर्घटनेत ३० तासाहून ही अधिक काळ बचाव कार्य सुरू असून रविवारी सकाळ पासून एन डी आर एफ ने सुरू केल्या बचाव कार्यात एका व्यक्तीची वीस तासानंतर सुखरूप जिवंत सुटका केली आहेत तर तीन मृतदेह बाहेर काढले आहेत.या दुर्घटनेतील मृतांची संख्या सहावर पोहचली असून दहा जणांना जिवंत बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश मिळविले आहे.

बचावकार्य सायंकाळी उशिरा पर्यंत सुरू राहणार असून अजून ही काही अडकले असल्याची भीती व्यक्त होत असल्याने त्यांचा शोध घेऊन त्या नंतरच येथील बचावकार्य थांबविण्यात येईल अशी माहिती भिवंडी तहसीलदार अधिक पाटील यांनी दिली आहे.घटनास्थळी दोन पोकलेन मशीन दोन जेसीबी टीडीआरएफ ,एनडीआरएफ पथकाकडून शोधमोहीम व बचाव कार्य सुरूच आहे.

रविवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास पहिल्या मजल्या वरील ढिगा-या खाली अडकून पडलेल्या सुनील पिसाळ यास जिवंत बाहेर काढले व त्यानंतर सुधाकर गवई वय ३४ वर्ष,प्रमोद चौधरी वय २२,त्रिवेणीप्रसाद यादव वय ४० वर्ष या तिघांचे मृतदेह ढिगा-या खालून काढण्यात आले आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: death toll in the building accident in bhiwandi has reached six

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.