वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यु: कळव्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 08:45 PM2017-07-19T20:45:01+5:302017-07-19T20:45:01+5:30

खारेगाव टोलनाका ते खारेगाव प्रवेशद्वारादरम्यान एका कारने दिलेल्या धडकेने अजय नेकराम शर्मा (३०, रा. कळवा) याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

The death of two-wheeler in the wheels of the vehicle: the incident incident | वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यु: कळव्यातील घटना

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यु: कळव्यातील घटना

Next

आॅललाईन लोकमत
ठाणे : खारेगाव टोलनाका ते खारेगाव प्रवेशद्वारादरम्यान एका कारने दिलेल्या धडकेने अजय नेकराम शर्मा (३०, रा. कळवा) याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे अपघात खारेगाव टोलनाक्यावर घडल्यानंतर अजयचा मृतदेह मात्र घोडबंदर रोडवरील विवियाना मॉलसमोरील पादचारी पुलाच्या खाली मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. कळवा पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.
अजय आणि त्याचा मित्र अजिंक्य शर्मा (२८, मूळचे दोघेही राहणार हिमाचल प्रदेश) हे दुचाकीवरून मुंबई नाशिक मार्गावरील खारेगाव प्रवेशद्वाराजवळून मंगळवारी रात्री जात होते. त्यांना समोरून येणाऱ्या एका कारची जोरदार धडक बसली. या अपघातात अजयच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तो जखमी झाला. तर, अजिंक्यलाही मार लागल्यामुळे तो बेशुद्ध पडला. त्याला काही नागरिकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अजय मात्र घोडबंदर रोडवरील विवियाना मॉलच्या समोरील स्कायवॉकच्या खाली राबोडी पोलिसांना मिळाला. सुरुवातीला त्याने स्कायवॉकवरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु, जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अजिंक्यने शुद्धीवर आल्यावर या अपघाताची माहिती कळवा पोलिसांना दिली. त्या वेळी या अपघाताचा उलगडा झाल्याचे कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम.एम. बागवान यांनी सांगितले. अपघात करणाऱ्या कारचा त्याने पाठलाग केल्याचीही शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, अजयचा मृतदेह घोडबंदर रोडवर कसा गेला, याचाही तपास करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. अजय आणि अजिंक्य हे हरियाणा येथील नंदन ट्रान्सपोर्टमध्ये कामाला असून त्यांचे नातेवाईकही हरियाणा आणि दिल्ली येथे आहेत. त्याचा मृतदेह हरियाणा येथून नातेवाईक आल्यानंतर त्यांच्या ताब्यात देणार असल्याचेही कळवा पोलिसांनी सांगितले.
...........................

Web Title: The death of two-wheeler in the wheels of the vehicle: the incident incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.