जिममधील तरुणीचा मृत्यू औषधामुळे, ट्रेनरच्या बॅगेतून मिळवले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2020 05:21 AM2020-03-06T05:21:18+5:302020-03-06T05:21:25+5:30

मेघनाच्या मृत्यूबाबत शंका उपस्थित करून मनविसेचे ठाण्यातील अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी ऑनलाइन औषधविक्रीबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाकडे पत्रव्यवहार केला होता.

The death of a young woman in the gym was obtained through a trainer's bag | जिममधील तरुणीचा मृत्यू औषधामुळे, ट्रेनरच्या बॅगेतून मिळवले

जिममधील तरुणीचा मृत्यू औषधामुळे, ट्रेनरच्या बॅगेतून मिळवले

Next

ठाणे : ठाण्यातील शरीरसौष्ठवपटू मेघना देवगडकर (२२) हिचा महिनाभरापूर्वी झालेला मृत्यू डायनीट्रोफिनॉल या घातक रसायनाच्या औषधामुळे झाल्याचे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मेघनाच्या मृत्यूबाबत शंका उपस्थित करून मनविसेचे ठाण्यातील अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी ऑनलाइन औषधविक्रीबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाकडे पत्रव्यवहार केला होता. त्यावर अन्न व औषध प्रशासन परिमंडळ-१ च्या सहा.आयुक्त माधुरी पवार यांनी पाचंगे यांना पाठवलेल्या उत्तरात हा खुलासा केला आहे.
त्यांनी परवानाधारक औषध विके्रत्यांकडून आॅनलाइन औषध विक्री होत नसल्याचे म्हटले आहे. तसेच, मेघनाने प्राशन केलेले औषध आयुर्वेदिक नसून तिने जिममधील ट्रेनर योगेश निकमच्या बॅगेमधून घेऊन सेवन केल्याने तिचा आकस्मिक मृत्यू ओढवला असल्याचे प्राथमिक तपास व चौकशी अहवालावरून दिसल्याचे म्हटले आहे. सदर घटक असलेल्या औषधाच्या उत्पादन व विक्र ीस केंद्र व राज्य शासनाची मान्यता नसल्याचेही या उत्तरात म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर पाचंगे यांनी आता ठाणे पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन अशा प्रकारे अवैधपणे औषधविक्री करणाऱ्यांवर गुन्हे
दाखल करून या प्रकरणाचा
गांभीर्याने तपास करण्याची मागणी केली आहे. यापूर्वी नौपाडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून हा गुन्हा कल्याण पोलीस ठाण्यात वर्ग
केला होता.

Web Title: The death of a young woman in the gym was obtained through a trainer's bag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.