आमदार निधीतून लावण्यात आलेल्या एलईडी स्क्रीनची मोडतोड, आव्हाडांचे ट्विट चर्चेत

By अजित मांडके | Published: February 13, 2023 03:25 PM2023-02-13T15:25:49+5:302023-02-13T15:26:00+5:30

ठाणे : कळवा भागात आमदार निधीतून उभारण्यात आलेली एलईडी स्क्रीन सोमवारी अचानक तोडून फोडून काढण्यात आल्या संदर्भातील टीव्ट आमदार ...

Debris of LED screen installed from MLA fund, Awhad's tweets in discussion | आमदार निधीतून लावण्यात आलेल्या एलईडी स्क्रीनची मोडतोड, आव्हाडांचे ट्विट चर्चेत

आमदार निधीतून लावण्यात आलेल्या एलईडी स्क्रीनची मोडतोड, आव्हाडांचे ट्विट चर्चेत

Next

ठाणे :

कळवा भागात आमदार निधीतून उभारण्यात आलेली एलईडी स्क्रीन सोमवारी अचानक तोडून फोडून काढण्यात आल्या संदर्भातील टीव्ट आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. किती ते सुडाचे राजकारण असा उल्लेख करीत कोणाच्या सांगण्यावरुन हा बोर्ड तोडण्यात आला असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. परंतु रविवारी गद्दार सेनेचे खासदार आणि शकुनीमानाच्या दौºयानंतर हा बोर्ड काढण्यात आला. मात्र शहरभर अशा प्रकारचे विविध पक्षाच्या पदाधिकाºयांचे बोर्ड लावण्यात आलेले आहेत. त्यांच्यावर का कारवाई नाही, असा सवाल आता राष्टवादीचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे यांनी उपस्थित केला आहे. महापालिका आयुक्त बांगर यांनी याची उत्तरे द्यावीत असेही त्यांनी सांगितले.

ठाण्यात सध्या बाळासाहेबांची शिवसेना विरुध्द राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात आरोप प्रत्यारोपांचे आणि फोडाफोडीचे राजकारण सुरु आहे. त्यात  रविवारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदार सघांत येणाºया कळवा, आणि मुंब्य्रातील विविध विकास कामांचा शुंभारभ करण्यात आला. यावेळी या भागात लावण्यात आलेल्या बॅनरवरुन राजकारण तापले आहे. राष्टÑवादीच्या काही माजी नगरसेवकांनी या संदर्भातील बॅनर लावून आव्हाडांना डिवचण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर सोमवारी अचानक कळवा पूर्वेला आमदार निधीतून  केलेल्या कामांचा उल्लेख असलेली एलईडी बोर्ड सकाळीच मोडतोड करुन काढण्यात आला. यावरुन आमदार आव्हाड यांनी टीव्ट केले असून किती ही सुडाचे राजकारण असा त्यात उल्लेख करण्यात आला आहे. दुसरीकडे येथील सामाजिक कार्यकर्ते अरविंद मोरे यांनी यावरुन गद्दार सेनेचे खासदार आणि शकुनीमामा यांच्या दोºयानंतर हा बोर्ड काढण्यात आला असल्याचे सोशल मिडियावर सांगितले आहे. संपूर्ण ठाण्यात असेच एलईडी स्क्रीन लावण्यात आलेले आहेत. परंतु केवळ आव्हाड यांच्यावर एवढा राग का? असा सवाल उपस्थित करीत या कारवाईचा निषेध केला आहे. दुसरीकडे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्यावर निशाना साधत शहरात लावण्यात आलेले इतर एलईडी बोर्ड त्यांना दिसले नाहीत का? असा सवाल उपस्थित केला आहे. एकूणच सुडाचे राजकारण आता आणखी तापणार असल्याचेच यावरुन दिसत आहे.

Web Title: Debris of LED screen installed from MLA fund, Awhad's tweets in discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.