पालिकेने टाकले मैदानावर मातीचे ढिगारे
By admin | Published: February 16, 2017 01:58 AM2017-02-16T01:58:20+5:302017-02-16T01:58:20+5:30
खेळाडू व खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी महापौर चषकाच्या नावाखाली लाखोंचा खर्च करणारी मीरा भार्इंदर महापालिका व सत्ताधारी
मीरा रोड : खेळाडू व खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी महापौर चषकाच्या नावाखाली लाखोंचा खर्च करणारी मीरा भार्इंदर महापालिका व सत्ताधारी शांती नगरच्या सेक्टर नऊमधील मैदानात मुलांना
क्रिकेटचा सराव व खेळण्यापासून रोखण्यासाठी इरेला पेटले आहेत. पालिकेने खेळपट्टी परिसरात महिन्याभरा पासून मुद्दाम माती टाकल्याने सरावासाठी येणाऱ्यांची गैरसोय होत आहे.
या लोकमान्य टिळक मैदानात काही खाजगी व्यक्ती पालिकेची परवानगी न घेता मुलांकडून पैसे घेऊन क्रिकेट शिकवतात असे प्रशासनाचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे याच मैदानात सराव करणारे सौमल मालंडकर व यश प्रसाद १४ वर्षाखालील गोल्ड शिल्ड क्रिकेट स्पर्धेत जेतेपद पटकावले आहे. (प्रतिनिधी)