दीडशे उदयोन्मुख कलाकारांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 03:10 AM2019-08-07T03:10:30+5:302019-08-07T03:10:39+5:30

महाराष्ट्रासह गोवा राज्यातील १०० ते १५० उदयोन्मुख कलाकारांची १० ते १५ लाखांची फसवणूक केल्याचे प्राथमिक चौकशीत उघड

Deception of two hundred emerging artists | दीडशे उदयोन्मुख कलाकारांची फसवणूक

दीडशे उदयोन्मुख कलाकारांची फसवणूक

Next

ठाणे : चित्रपटात तसेच मालिकांमध्ये भूिमका साकारण्याचे काम मिळवून देण्याच्या नावाखाली उदयोन्मुख कलाकार आणि त्यांच्या पालकांची फसवणूक करणाऱ्या संदीप व्हरांबळे उर्फ संदीप पाटील उर्फ सँडी (३२, रा. कासारवडवली, घोडबंदर रोड, ठाणे) यास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटच्या पथकाने सोमवारी अटक केली. त्याने महाराष्ट्रासह गोवा राज्यातील १०० ते १५० उदयोन्मुख कलाकारांची १० ते १५ लाखांची फसवणूक केल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले.

डोंबिवलीतील रहिवाशी रवींद्र कुलकर्णी यांचा मुलगा अद्वैतला काम मिळवून देतो, असे सांगत त्याचा पोर्टफोलिओ बनवण्यासाठी ११ हजार रुपये द्यावे लागतील, असे संदीपने सांगितले होते. कुलकर्णी यांना त्याने स्वत:च्या बँक खात्याचा क्रमांक देऊन त्या खात्यावर ११ हजार रुपये जमा करण्यास सांगितले. ते जमा केल्यावर पोर्टफोलिओ दिला नाही. तसेच त्यास काम मिळवून दिले नाही. शिवाय, त्यांचे ११ हजार रुपयेदेखील परत केले नाहीत. याप्रकरणी कुलकर्णी यांनी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रविण पवार यांच्याकडे तक्रार केली.

हे प्रकरण गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटकडे सोपविले. पोलीस उपायुक्त दीपक देवराज, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे , पोलीस उपनिरीक्षक भूषण शिंदे यांनी केलेल्या चौकशीमध्ये कुलकर्णी यांच्याप्रमाणे संदीप याने आणखीही काही जणांची अशाच प्रकारे चार लाख ७५ हजारांची फसवणूक केल्याची बाब समोर आली. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार त्याला ५ ऑगस्ट रोजी घोडबंदर रोड, कासारवडवली येथील ‘रोझा गार्डन’ या इमारतीमधील त्याच्या घरातून अटक केली.

मालिकांचे प्रलोभन
आतापर्यंत त्याने सुमारे १५० उदयोन्मुख कलाकारांची सुमारे १५ लाखांची फसवणूक केल्याचेही उघड झाले आहे. आधी पालकांना विश्वासात घेऊन मुलांना काम टीव्ही मालिकांमध्ये काम देण्याचे तो प्रलोभन दाखवायचा. चित्रपटात मुलाला काम मिळेल, या आशेपोटी पालकही त्याला पैसे देत होते.

Web Title: Deception of two hundred emerging artists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.