परिवहन सभापतींकडून सुविधांचा त्याग अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे निर्णय :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 11:02 PM2020-01-15T23:02:16+5:302020-01-15T23:02:43+5:30

केडीएमटी उपक्रमात सध्या ५६९ कर्मचारी, तर उपक्रमाच्या ताफ्यात २१८ बस आहेत

Decision on the departure of facilities by the transport chairmen due to inadequate staff: | परिवहन सभापतींकडून सुविधांचा त्याग अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे निर्णय :

परिवहन सभापतींकडून सुविधांचा त्याग अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे निर्णय :

googlenewsNext

कल्याण : एकीकडे पद म्हटले की, प्रतिष्ठा आली. त्यात पदाधिकाºयांच्या दिमतीला वाहनचालक, सुरक्षारक्षक आणि शिपाई असतात. पद आणि प्रतिष्ठा मिळविण्यासाठी अनेकजण धडपडत असतात. मात्र, केडीएमटीचे सभापती मनोज चौधरी यांनी परिवहन उपक्रमाची दयनीय अवस्था पाहता त्यांना दिलेल्या सुविधांचा त्याग केला आहे. कर्मचाºयांची कमतरता भेडसावत असल्याने चौधरी यांनी त्यांना दिलेला सुरक्षारक्षक, वाहनचालक आणि शिपाई यांना गणेशघाट आगारात कर्तव्यावर पाठविले आहे.

केडीएमटी उपक्रमात सध्या ५६९ कर्मचारी, तर उपक्रमाच्या ताफ्यात २१८ बस आहेत. परंतु, वाहक आणि चालकांची कमतरता तसेच देखभाल दुरुस्तीअभावी यातील केवळ ७० बस रस्त्यावर धावत आहेत. याचा परिणाम उपक्रमाच्या उत्पन्नावरही झाला आहे. नुकत्याच झालेल्या परिवहन समितीच्या सभेत घटलेल्या उत्पन्नावरून अधिकाºयांना धारेवर धरण्यात आले होते. वार्षिक देखभाल दुरुस्ती कंत्राटाचे (एएमसी) तीन कोटी रुपयांचे बिल केडीएमटीकडून थकल्याने हे कंत्राट बंद करण्यात आले. कंत्राटदाराच्या नोटिशीनंतर समितीनेही कंत्राट बंद करण्यासाठी हिरवा कंदील दाखविला आहे. एएमसी बंद झाल्याने ३२ चालकांची भासणारी उणीव पाहता जे चालक, वाहक, लिपिक, सुरक्षारक्षकासह अन्य विभागांत काम करत असतील, त्यांनी मूळ पदाचे चालक, वाहकाचे काम करणे बंधनकारक आहे. त्यामुळे अशा कर्मचाºयांना तत्काळ सूचना द्या, असे आदेश नोव्हेंबरमध्ये झालेल्या परिवहन समितीच्या सभेत प्रशासनाला दिले गेले होते. परंतु, त्याप्रमाणे आजवर कृती झालेली नाही. परिणामी, कर्मचाºयांची भेडसावणारी कमतरता पाहता चौधरी यांनीच आता त्यांना दिलेल्या सुविधांचा त्याग करत सुरक्षारक्षक, वाहनचालक व शिपाई यांना आगारात पाठविले आहे. याबाबतचे पत्र त्यांनी मंगळवारी सायंकाळी परिवहन व्यवस्थापक मारुती खोडके यांना दिले आहे. त्यानुसार, बुधवारपासून संबंधित कर्मचारी गणेशघाट आगारात कार्यरत असल्याचे चौधरी म्हणाले.

‘ते’ बोध घेणार का?
सभापतींच्या कृतीतून कामचुकार आणि दांडीबहाद्दर कर्मचारी काही बोध घेणार का? अशीही चर्चा पालिका वर्तुळात सुरू झाली आहे. सभापतींच्या निर्णयासंदर्भात उपक्रमाचे व्यवस्थापक खोडके यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

Web Title: Decision on the departure of facilities by the transport chairmen due to inadequate staff:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.