लसीकरण व कोविड उपचार केंद्र सुरु करण्याचा आढावा बैठकीत निर्णय 

By धीरज परब | Published: March 29, 2023 02:35 PM2023-03-29T14:35:24+5:302023-03-29T14:36:35+5:30

महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी शहरातील कोविड स्थिती व उपाययोजना बाबत आढावा बैठक घेण्याचे निर्देश दिले होते .

decision in review meeting to start vaccination and covid treatment center in mira bhayandar | लसीकरण व कोविड उपचार केंद्र सुरु करण्याचा आढावा बैठकीत निर्णय 

लसीकरण व कोविड उपचार केंद्र सुरु करण्याचा आढावा बैठकीत निर्णय 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेत संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन लसीकरण , कोविड उपचार केंद्र आदी सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .  

महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी शहरातील कोविड स्थिती व उपाययोजना बाबत आढावा बैठक घेण्याचे निर्देश दिले होते . मुख्यालयातील सभागृहात अतिरिक्त आयुक्त डॉ . संभाजी पानपट्टे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उपायुक्त संजय शिंदे ,  वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नंदकिशोर लहाने, डॉ . अंजली पाटील सह अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते . 

ऑक्सिजन प्लांट तपासून घेणे , पुरेसा ऑक्सिजन व औषधांचा साठा उपलब्ध करून घेणे , प्रमोद महाजन सभागृहातील कोविड उपचार केंद्राची साफसफाई करून आवश्यक खाटा , अतिदक्षता विभागातील आयसीयू खाटा आदींची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले. रुग्ण वाढ होत नसली तरी आपत्कालीन परिस्थितीत महापालिकेने पूर्ण तयारीनिशी सज्ज राहणे आवश्यक असल्या बाबत चर्चा झाली . कोविड बूस्टर डोस तसेच १८ वर्षांवरील नागरीकांकरिता लसीचे दोन्ही डोस पुन्हा मोठ्या प्रमाणात सुरू करण्या साठी पालिकेची सर्व लसीकरण केंद्र ही पुन्हा खुली केली जाणार आहेत . 

नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर , वारंवार साबणाने हात स्वच्छ धुवावे, सामाजिक अंतर राखणे या त्रिसूत्रीचे काटेकोरपणे पालन करण्यासह नागरिकांना लस घेण्याचे आवाहन करतानाच कोणत्याही प्रकारची अफवा पसरवून भीतीचे वातावरण निर्माण करू नये असे डॉ . पानपट्टे यांनी सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: decision in review meeting to start vaccination and covid treatment center in mira bhayandar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.