राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकडून बेमुदत संपाचा निर्णय

By सुरेश लोखंडे | Published: November 30, 2023 06:33 PM2023-11-30T18:33:44+5:302023-11-30T18:33:52+5:30

राज्य शासनाने "जुनी पेन्शन योजना सर्वाना लागू करा" या मागणीबाबत लेखी हमी देऊन कर्मचाऱ्यांना दिलासा दिला होता.

Decision of indefinite strike by state government employees | राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकडून बेमुदत संपाचा निर्णय

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकडून बेमुदत संपाचा निर्णय

ठाणे : जिल्ह्यातील सरकारी, निमसरकारी, शिक्षकख्शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने घेतलेल्या निर्णयानुसार या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी १४ डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य पातळीवरील या बेमुदत संपात सहभागी हाेण्यासाठी या कर्मचाऱ्यांच्या राज्य सरकारी कर्मचारी मध्ण्यवर्ती संघटनेने ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे मुख्यमंत्र्यांसाठी निवेदन देऊन त्यात बेमुदत संपाचा इशारा दिला आहे, असे या संघटनेचे सरचिटणीस भास्कर गव्हाळे यांनी सांगितले.

या आधी राज्य शासनाने "जुनी पेन्शन योजना सर्वाना लागू करा" या मागणीबाबत लेखी हमी देऊन कर्मचाऱ्यांना दिलासा दिला होता. इतर १७ मागण्यांबाबत सत्वर निर्णय घेतले जातील असेही निसंदिग्ध आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यामुळे शासन स्तरावरील कार्यवाही पूर्ण होण्यास वेळ मिळावा या उद्देशाने या आधीचा संप कर्मचाऱ्यांनी मागे घेतला हाेता. पण आश्वासन देऊन आजपर्यंत काेणत्याही मागण्यांचा विचार करण्यात आलेला नसल्याचा आराेप करून या कम्रचाऱ्यांनी आता बेमदुत संपाचा इशारा दिला आहे. त्याची नाेटीस आज जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना जारी केली आहे. त्यावर ते आता कार्य निर्णय घेणार याकडे कम्रचाऱ्यांचे लक्ष लागून आहे. मात्र बेमुदत संप हा अटळ असल्याचे गव्हाळे यांनी स्पष्ट केले.

Web Title: Decision of indefinite strike by state government employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे