मंदिरं उघडण्याचा निर्णय दिवाळीनंतर, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2020 04:09 PM2020-11-10T16:09:34+5:302020-11-10T16:10:16+5:30

Rajesh Tope : कल्याणमध्ये राष्ट्रवादी पक्षाची बैठक व महापालिका हद्दीतील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री टोपे आले होते. महापालिकेतील बैठकीपश्चात त्यांनी ही माहिती दिली.

Decision to open temples after Diwali, Health Minister Rajesh Tope informed | मंदिरं उघडण्याचा निर्णय दिवाळीनंतर, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मंदिरं उघडण्याचा निर्णय दिवाळीनंतर, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

googlenewsNext

कल्याण : सर्वसामान्यांसाठी रेल्वे सेवा व मंदिरं उघडण्याचा निर्णय दिवाळीनंतर घेतला जाऊ शकतो, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. या दोन्ही गोष्टीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेतील असेही टोपे यांनी सांगितले. कल्याणमध्ये राष्ट्रवादी पक्षाची बैठक व महापालिका हद्दीतील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री टोपे आले होते. महापालिकेतील बैठकीपश्चात त्यांनी ही माहिती दिली. 

दिवाळीनंतर कोरोना रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रेल्वे सेवा सुरु करण्याचा व मंदिरे उघडण्याचा निर्णय हा दिवाळीपश्चात घेतला जाऊ शकतो. सोशल डिस्टसिंग कसे पाळले जाईल. त्यासाठी एसओपी तयार करावे लागेल. तसेच टास्क फोर्सने त्यावर काम सुरु केले आहे याकडे टोपे यांनी लक्ष वेधले आहे.

आज कल्याणमध्ये राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष नेमण्याकरीता कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत, ऐकून घेण्यासठी आलो आहे. त्या ऐकून त्यानुसार पक्ष श्रेष्ठीकडे अहवाल दिला जाईल. त्यानंतर कल्याण राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष नेमला जाईल, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष पदाकरीता जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची चर्चा आहे. याविषयी टोपे यांच्याकडे विचारणा केली असता हा संपूर्ण निर्णय पक्षश्रेष्ठींचा आहे.

बिहारचे निकाल पाहता लोकांची सरकार विरोधात जी नाराजी होती. त्यातून ही दिसून आली. तेजस्वी सारख्या तरुणाने बिहारमध्ये एकाकी लढत दिली. लालू प्रसाद यादव हे तुरुंगात असताना तेजस्वीची लढत ही कौतुकास्पद आणि अभिनंदनास पात्र आहे, अशी प्रतिक्रिया बिहार निकालासंदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
 

Web Title: Decision to open temples after Diwali, Health Minister Rajesh Tope informed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.