म्हाडाच्या परीक्षा रद्द न करता पुन्हा मुख्य परीक्षा घेण्याचा निर्णय- मंत्री जितेंद्र आव्हाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2021 03:59 PM2021-12-11T15:59:19+5:302021-12-11T15:59:31+5:30
म्हाडामधील नौकर भरतीसाठी होणार आहेत. यापूर्वी आरोग्य विभागातील भरतीकरिता परीक्षा झाल्या आणि पेपर फुटीचे प्रकरण बाहेर पडले.
ठाणे : म्हाडामधील नौकर भरतीसाठी होणार आहेत. यापूर्वी आरोग्य विभागातील भरतीकरिता परीक्षा झाल्या आणि पेपर फुटीचे प्रकरण बाहेर पडले. यावरून वादंग सुरू असताना म्हाडा भरतीमध्ये आर्थिक व्यवहार झाले असल्याच्या तक्रारी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कानावर आल्या आहेत.
या तक्रारींची गंभीर दखल घेत आव्हाड यांनी दोषींना सोडले जाणार नाही, असा सज्जड दम दिला आहे. एवढ्यावर ते थांबले नाहीत तर आता परीक्षा रद्द न करता पुन्हा मुख्य परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे म्हाडामधील परीक्षेत होणाऱ्या गडबडीला वेळीच आळा घेतला जाईल, असे आव्हाड यांनी ठाण्यातील एका कार्यक्रमात स्पष्ट केले.