ठाण्याचे आयुक्त माफी मागेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:07 AM2018-03-28T00:07:40+5:302018-03-28T00:07:40+5:30

आयुक्तांनी महापौरांची जाहिर माफी या मुद्यावरून सोमवारपासून सुरूअसलेले ठाणे मतदाता जागरण अभियानच्या उन्मेश बागवे यांचे आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरुच होते

The decision of the Thane Commissioner to apologize not to withdraw the movement | ठाण्याचे आयुक्त माफी मागेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार

ठाण्याचे आयुक्त माफी मागेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार

googlenewsNext

ठाणे : आयुक्तांनी महापौरांची जाहिर माफी या मुद्यावरून सोमवारपासून सुरूअसलेले ठाणे मतदाता जागरण अभियानच्या उन्मेश बागवे यांचे आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरुच होते. या आंदोलनकर्त्यांनी मंगळवारी महापौरांची भेट घेऊन जो पर्यंत आयुक्त तुमची किंबहुना ठाणेकरांची माफी मागत नाहीत, तो पर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे स्पष्ट केले.
महासभेला गैरहजर राहून आयुक्तांनी तसेच संपूर्ण प्रशासनाने ठाणे शहराच्या पहिल्या नागरिक म्हणजेच महापौरांचा अपमान केला आहे. हा त्यांचा अपमान नसून समस्त ठाणेकरांचाच अपमान असल्याची भूमिका घेऊन बागवे यांनी सोमवारपासून पालिका मुख्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे. मंगळवारी दुसºया दिवशीदेखील ते सुरुच होते. त्यांच्या या आंदोलनाला आता शहरातील अनेक दक्ष नागरिकांचा पाठींबा मिळू लागला आहे. दरम्यान मंगळवारी आंदोलन सुरू असतांनाच महापौर मीनाक्षी शिंदे यांनी त्यांना भेटण्यासाठी बोलावले होते. या भेटीदरम्यान उन्मेश बागवे, अनिल शाळीग्राम आणि वंदना शिंदे यांनी या सत्याग्रहाची भूमिका महापौरांसमोर विशद केली. सभागृहात उपस्थित न राहता महापौरांचा अवमान करणाºया आयुक्तांचा निषेध करून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला. महापौर या शहराच्या प्रथम नागरिक असून त्यांचा अपमान म्हणजे सर्व ठाणेकरांचा अपमान त्यांनी संपूर्ण ठाणेकरांची जाहिर माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे. या आंदोलनाला महापौरांनी पाठिंबा दिला असला तरी सहभागी होण्याबाबत आश्वासन दिले नाही.

Web Title: The decision of the Thane Commissioner to apologize not to withdraw the movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.