ठाणे जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्यावर उद्या होणार निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 08:28 PM2021-08-02T20:28:22+5:302021-08-02T20:28:44+5:30
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत ठाणे जिल्ह्यातील निर्बंध हटविण्यात आले असून रेस्टॉरन्ट, मॉल, थिएटर, सलून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत ठाणे जिल्ह्यातील निर्बंध हटविण्यात आले असून रेस्टॉरन्ट, मॉल, थिएटर, सलून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे ठाणे, कल्याण डोंबिवलीसह संपूर्ण जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे.
राज्य शासनाने कोरोना महामारीमुळे लादलेले निर्बंध पाच टप्प्यात शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑक्सिजनची उपलब्धता आणि बेड खाली असल्याची संख्या ज्या जिल्ह्यात जास्त आहे, त्या जिल्ह्यात निर्बंध उठविण्यात आले आहेत, त्यामध्ये ठाणे जिल्ह्याचा समावेश आहे. परंतु निर्बंध कशा पद्धतीने शिथिल करायचे याबाबतचा निर्णय मंगळवारी बैठकी द्वारे घेतला जाणार आहे.
जिल्हाधिकारी ठाणे महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्त यांच्यासमवेत ही संयुक्त बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीनंतर ठाणे जिल्ह्यातील निर्बंध कशापद्धतीने शिथिल करावेत, याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे अशी माहिती आणि महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिली.