उल्हासनगर न्यायालय प्रांगणात घोषणा प्रकरण

By सदानंद नाईक | Published: February 5, 2024 08:24 PM2024-02-05T20:24:40+5:302024-02-05T20:25:00+5:30

भाजपचे निलेश बोबडे यांची चौकशी, ६ तास ठेवले बसून

Declaration case in Ulhasnagar court premises | उल्हासनगर न्यायालय प्रांगणात घोषणा प्रकरण

उल्हासनगर न्यायालय प्रांगणात घोषणा प्रकरण

सदानंद नाईक/ उल्हासनगर :उल्हासनगरन्यायालय परिसरात आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करणाऱ्या ११ जनासह इतर ४० ते ४५ जणांवर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यातील भाजप पदाधिकारी निलेश बोबडे यांना क्राईम ब्रँचने रविवारी डोंबिवली कार्यालयात बोलावून चौकशीच्या नावाखाली ६ तास बसून ठेवल्याचे उघड झाले.

 उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यातील गोळीबार प्रकरणातील आरोपी आमदार गणपत गायकवाड, हर्षल केणे व संदीप सरवनकर यांना शनिवारी उल्हासनगर न्यायालयात आणले होते. यावेळी गणपत गायकवाड यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला होता. घोषणा देणाऱ्या ११ जनासह इतर ४० ते ४५ जणांवर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाला. या गुन्ह्यातील संशयित आरोपी असलेले भाजप पदाधिकारी निलेश बोबडे यांना क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी रविवारी दुपारी १ वाजता डोंबिवली कार्यालयात बोलावून चौकशी केली. तसेच सायंकाळचे ७ वाजेपर्यंत कार्यालयात बसून ठेवले. असे निलेश बोबडे यांचे म्हणणे आहे. सक्रिय भाजप कार्यकर्त्यांना दाबण्याचा पर्यंत पोलिसांकडून होत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी बोलून दाखविली. शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे बोबडे यांचे म्हणणे आहे.

Web Title: Declaration case in Ulhasnagar court premises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.